अभिनेत्री पूजा सावंत बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली पाहायला मिळाली. अभिनेत्रीने तिच्या होणाऱ्या पतीबरोबरचे पाठमोरे फोटोस शेअर करत रिंग फ्लॉन्ट केली. त्यामुळे नेमकी पूजा कोणाला डेट करतेय हे जाणून घेणं चाहत्यांना उत्सुकतेचं राहिलं. (Pooja Sawant And Siddhesh Chavan)
याआधी पूजा सावंतचं नाव अनेक अभिनेत्यांसह जोडलं गेलं मात्र आता या चर्चांना अभिनेत्रीने पूर्णविराम दिला आहे. पूजाने तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाणबरोबरचे फोटो शेअर केले. पूजाचं अरेंजमॅरेज असल्याचं तिने मुलाखतीदरम्यान म्हटलं. लवकरच पूजा व सिद्धेश लग्नबंधनात अडकणार असल्याचंही समोर आलं. पूजाने तिच्या लग्नाबाबतची माहिती स्वतः दिली आहे. त्यामुळे पूजा कधी लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळवून घेतल्या आहेत.
लग्नाआधी पूजा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मिस करत असल्याचं समोर आलं आहे. पूजा सावंतने होणारा नवरा सिद्धेश चव्हाणबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “प्रमोशनच्या व्यस्त श्येड्युलमध्ये मला काय हवंय हे मलाच माहिती आहे. लवकर भेट सिद्धेश” असं म्हणत तिने सिद्धेशसाठी ही पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत “मिस यु” असं म्हटलं आहे.
पूजाच्या या पोस्टवर सिद्धेशने प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळत आहे. तो म्हणाला,”बोजू, तुझी खूप आठवण येत आहे. तुला भेटण्याची वाट पाहत आहे”. तसेच कलाकार मंडळींसह चाहत्यांनी देखील पूजाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.