शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पाठकबाईंचं ‘झी मराठी’वर कमबॅक! ‘या’ नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस, प्रोमो पाहताच अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 27, 2024 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Akshaya Deodhar New Serial

अक्षया देवधर 'या' नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Akshaya Deodhar New Serial : ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच सर्वांची लाडकी पाठकबाई अक्षया देवधर. अक्षयाने या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेमुळेच अक्षयाला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातही मालिकेतील तिचा सहकलाकार आला आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. पाठक बाई व राणादा ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आणि एकत्र येत त्यांनी साऱ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता पुन्हा एकदा पाठक बाई ‘झी मराठी’वर कमबॅक करताना दिसणार असल्याचे समोर आले आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर आता पाठकबाई या ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं. नुकताच ‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२४’ चा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. यावेळी ‘झी मराठी’ वाहिनी कडून ‘लक्ष्मी निवास’ या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. इतकंच नव्हे तर या पुरस्कार सोहळा दरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीने ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेचा पहिला प्रोमोदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेते तुषार दळवी हे मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळतेय.

आणखी वाचा – बिश्नोई समाजाने सलीम खान व सलमान खान यांचा पुतळा जाळला, ‘या’ वक्तव्याने उडाला भडका, प्रकरण निवळलं नाही तर…

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या प्रोमो मध्ये त्यांचा फॅमिली फोटो पाहायला मिळत असून यात अक्षया देवधर महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचा समोर आलंय. पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर अक्षया देवधरला पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार असल्याचे दिसतेय. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन करण्यासाठी अक्षया सज्ज झाली आहे. तिच्या जोडीला यामध्ये अभिनेता कुणाल शुक्ला महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा – अखेर स्वप्न पूर्ण! सूरज चव्हाणच्या नव्या घराचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न, गावकऱ्यांच्या उपस्थिती पूजा केली अन्…

अक्षया नव्या मालिकेत झळकणार हे समजताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेत अक्षयाला पाहायला चाहतावर्ग उत्सुक आहे. या कौटुंबिक मालिकेत प्रेक्षकांना दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका नेमकी कधीपासून सुरु होणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Tags: akshaya deodharAkshaya Deodhar New Seriallaxmi niwas serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Navri Mile Hitlarla new promo

लीलाची सासूगिरी सुरु! नव्या अवताराने मिळणार सूनांना धक्का, प्रोमो पाहून नेटकरीही खुश, म्हणाले, "ज्या गोष्टीची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.