Akshaya Deodhar And Hardik Joshi : मराठी सिनेविश्वातील अशी बरीच जोडपी आहेत जी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. शिवाय ते चाहत्यांसह काही ना काही शेअर करत नेहमीच संपर्कात राहत असतात. या नेहमीच चर्चेत असणाऱ्या आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे हार्दिक व अक्षया यांची भेट झाली. या मालिकेत हार्दिकने राणा दा आणि अक्षयाने पाठकबाई ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे हार्दिक व अक्षया घराघरांत पोहोचले. या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दोघांनी खऱ्या आयुष्यात एकत्र येत प्रेमाची कबुली दिली. दोघांना मालिकेत एकत्र पाहिल्यावर ही जोडी कायम एकत्रच राहावी, असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटायचं, आणि अगदी तसंच घडलं.
मालिका संपल्यानंतर अक्षया व हार्दिक यांचे खऱ्या अर्थाने सूर जुळले. दोघांनी थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद दिला होता. ही जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आलेली पाहून चाहत्यांचा आनंद गंगनात मावेनासा झाला. हार्दिक व अक्षया २ डिसेंबर २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आज या जोडप्याच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला दोन वर्ष पूर्ण होताच दोघांनी एकेमकांसाठी खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – चर्चा खोट्याच; लेकीच्या वाढदिवसाला अभिषेक बच्चनही होता हजर, ऐश्वर्या रायसह पार्टी, व्हिडीओ व्हायरल
हार्दिकने पोस्ट शेअर करत त्यांच्या लग्नातील काही खास फोटोंचा कोलाज करुन बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. “ज्या दिवशी मी तुझ्याशी लग्न केलं, तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. तू माझी सोबती आणि माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस. माझे तुझ्यावर नेहमी प्रेम आहे. दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे प्रेम”, असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – आई होऊ न शकल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला टोमणे, नवऱ्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “मूल नसेल तर…”
तर अक्षयाने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षणांचा व्हिडीओ तयार करुन पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नाची झलकही पाहायला मिळतेय. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “प्रेम भी तू, दोस्त भी तू, एक भी तू, हजार भी तू, गुस्सा भी तू, माफी भी तू, जिंदगी के सफ़र में काफ़ी भी तू, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पार्टनर”, असं रोमँटिक कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय दोघांच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षावही होताना पाहायला मिळत आहे.