बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटाबरोबर आणखी एका कारणांमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे, पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे. काही दिवसांपूर्वी पान मसाल्याची एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये अक्षयसह अजय देवगण व शाहरुख खान हे देखील दिसले. दीड वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेत्याने ही जाहिरात केली, तेव्हा त्याच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्याने माफीनामा सादर करत यापुढे मी ही जाहिरात करणार नसल्याचे म्हटलं होतं. पण, आता तो या जाहिरातीत पुन्हा दिसल्याने नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अखेर अक्षयने यावर आपलं मौन सोडलं आहे. (Akshay Kumar clarifies on pan masala Ad)
‘बॉलिवूड हंगामा’ने अक्षयच्या पान मसाला जाहिरातीचं वृत्त “पान मसाला ब्रँडचा अँबेसेडर म्हणून परतला” अश्या मथळ्याखाली देत ट्विट केली. त्या ट्विटला उत्तर देताना अक्षयने त्या वेबसाईटची चांगलीच खरडपट्टी काढली. अक्षय या ट्विटमध्ये म्हणाला, “ब्रँड अँबेसेडर म्हणून परतला? जर तुम्हाला खोट्या बातम्या पसरवण्यात आणि इतर गोष्टींमध्ये रस असेल, तर मी एक फॅक्ट चेक सांगतो. मी ही जाहिरात १३ ऑक्टोबर २०२१ मध्ये शूट केली होती. मी ज्यावेळी ही जाहिरात न करण्याची घोषणा केली, तेव्हापासून या ब्रँडचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते आधीच शूट केलेल्या जाहिराती कायदेशीररीत्या पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत चालवू शकतात. शांत व्हा आणि काही खऱ्या बातम्या करा.”
हे देखील वाचा – शहनाज गिलची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “विषबाधा झाली अन्…”
‘Returns’ as ambassador? Here’s some fact check for you Bollywood Hungama, if by chance you are interested in things other than fake news. These ads were shot on 13th October, 2021. I have not had anything to do with the brand ever since I publicly announced the discontinuation…
— Akshay Kumar (@akshaykumar) October 9, 2023
अक्षयचं हे ट्विट जोरदार चर्चेत आलं असून नेटकरी त्याच्या या ट्विटवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, अक्षयने जेव्हा प्रथमच ही जाहिरात केली. तेव्हा ती पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्याला जोरदार ट्रोल केले होते. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली होती. शिवाय, भविष्यात आपण तंबाखू व त्याशी संबंधित अन्य कोणत्याही उत्पादनाचे समर्थन अथवा जाहिरात करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
हे देखील वाचा – आधी माफी मागितली, आता पुन्हा एकदा पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये दिसला अक्षय कुमार, नेटकरी भडकले, म्हणाले, “पैशांसाठी तो…”
पण आता तो याच जाहिरातीत पुन्हा दिसल्याने नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलं आहे. नुकताच अक्षयचा ‘मिशन राणीगंज’ चित्रपट प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. असं असलं तरी, त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.