गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने सांगितला कोल्हापुरच्या महालक्ष्मीचा अनुभव, म्हणाली, “त्या आईनेच सगळं केलं कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 16, 2023 | 6:01 pm
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
rupali bhosle shared her divine experience

rupali bhosle shared her divine experience

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले. सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुपाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. ती आयुष्यातील घडामोडीसंबंधीत फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच तिने कोल्हापूरातील जागृक देवस्थान देवी अंबाबाईबद्दलचा एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा गणेशोत्सव सोहळा साजरा होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रुपालीने एका खास नृत्याचे सादरीकरण करणार आहे. हे सादरीकरण तिच्यासाठी खूप खास ठरलं असल्याचं तिने पोस्ट शेअर करत सांगितलं. ही पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.(rupali bhosle shared her divine experience)

रुपालीने पोपटी रंगाच्या साडीमध्ये फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना तिने लिहीलं, ‘कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आहे. तसेच ते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी झाला. मला आई बोलली की बाकी कोणतेही उपवास केले नाही तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार नक्की करायचे. पण मी आजपर्यंत जमेल तसे बाकीचे उपवास तर करतेच पण हे गुरुवारचे उपवासही करते. जन्म झाला तेव्हा आई-बाबांना लक्ष्मी घरात आली असं वाटत असेल का? हा प्रश्न मला कायम  पडायचा. पण माझ्या आईबाबांनी कायम मला लक्ष्मी सारखंच वागवलं. देवीआईचा आशीर्वादही माझ्या कायम माझ्या पाठीशी आहे व नेहमी असेल. ‘स्टार प्रवाह’च्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरला गेले होते. पण महालक्ष्मीचं दर्शन घेता आलं नाही’.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

आणखी वाचा – महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, “वंशाचा दिवा पुढे…”

पुढे रुपाली लिहीते, ‘मनाला खूप त्रास झाला. शेवटी ती आईच! तिला माझ्या मनातली भावना समजली व जणू तिच मला भेटायला आली. या वर्षीच्या ‘स्टार प्रवाह’ गणेशोत्सवाची तालीम करायला गेले. मला सांगितलं की कोल्हापूरची महालक्ष्मी मला साकारायची आहे. मी लगेच माझ्या आईला कॉल केला ही बातमी सांगितलं. हा योगायोग आहे की काय? पण हे सगळं त्या आईनेच केलं असेल असं मला वाटतं. इच्छा शक्ति व मनापासून मारलेली हाक देवापर्यंत पोहोचते हे मात्र खरं आहे. ‘स्टार प्रवाह’चे खरचं खूप आभार. भरभरून लिहीलं आहे गोड मानून घ्या. पहिल्यांदा इतकं लिहीलं वैभव घुगे व टीमचे आभार”, असं म्हणत रुपालीने फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

आणखी वाचा – “तुझ्याशिवाय हे घर…”, अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन, भावुक होत म्हणाला, “मी तुझ्याशिवाय…”

नेटकऱ्यांनीही भरभरून कमेंट करत रुपालीच्या फोटोंचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यांने मी पण मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जन्मले असं म्हणत फोटोवर कमेंट केला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने परमेश्वर पाठीराखा म्हणत तिच्या अनुभवाला दुजोरा दिला.

Tags: aai kuthe kay kartefame actressrupali bhosleshared her divine experience
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Sophie Turner viral video after separation

Video : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे प्रियांका चोप्राच्या जाऊबाईचं प्रसिद्ध अभिनेत्याला किस, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.