मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अजित पवार यांचा अपघातात मृत्यू; सायली संजीवसह अंकिता वालावलकर भावुक: म्हणाली, “तुमच्याशिवाय राजकारण अपूर्ण आहे”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 28, 2026 | 12:08 pm
in Entertainment, Trending
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Celebrity Emotional Post On Ajit Pawar Death

"तुमच्याशिवाय राजकारण अपूर्ण आहे”

Marathi Celebrity Emotional Post On Ajit Pawar Death : राज्यातून सध्या एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रवासादरम्यान विमान अपघात झाल्याची माहिती डीजीसीएकडून समोर आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने, म्हणजेच बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती येथे सभेसाठी येत होते. मात्र, लँडिंग करताना विमानाला अपघात झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान झाला. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागल्याचं माहितीत नमूद करण्यात आलं आहे. घटनेनंतर बचावकार्य आणि तपास प्रक्रिया सुरू असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम संबंधित यंत्रणांकडून केलं जात आहे.या धक्कादायक घटनेनंतर मराठी मनोरंजनसृष्टीतही तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अभिनेत्री सायली संजीवने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, “ही गोष्ट स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. अजित दादा, तुमच्याशिवाय राजकारण अपूर्ण आहे,” अशा शब्दांत आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Video : बारामतीत विमान लँडिंग दरम्यान कोसळलं अन्…; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू, त्यावेळी नेमकं काय घडलं?

तसेच, लोकप्रिय सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व अंकिता वाळवलकर हिने देखील पोस्ट शेअर करत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या दोन्ही पोस्ट्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या अपघातासंदर्भात अधिकृत पातळीवर पुढील माहितीची प्रतीक्षा असून, तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

आणखी वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

Tags: अजित पवारांचा अपघातात मृत्यूdeath newsMarathi Celebrity Emotional Post On Ajit Pawar Death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Ajit Pawar Passes Away

"त्यांचं अकाली जाणं…"; अजित पवारांच्या निधनानंतर रितेश देशमुखची भावुक पोस्ट, म्हणाला, "ही पोकळी कधीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.