डोक्यावरून आई-वडीलांचं छत्र हरपणं ही कोणत्याही मुलांसाठी अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. पोरकं होण्याची भावना ही मुलांसाठी कल्पनेपलीकडील आहे. अजिंक्य देव सध्या अशाच दु:खद भावना जगत आहे. अजिंक्य देव यांची आई व बाबा म्हणजेच दिवंगत अभिनेत्री सीमा देव व अभिनेते रमेश देव यांनी दोन वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. यानंतर अजिंक्य देव यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत अनेकदा भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच त्यांनी नुकतीच एक कविता शेअर केली आहे आणि ही कविता त्यांनी आपल्या वडिलांना अर्पण केली आहे. अजिंक्य देव यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ पोस्ट करत ही कविता सादर केली आहे. (Ajinkya Deo Emotional Poem)
ही कविता सादर करताना अजिंक्य देव काहीसे भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. रमेश देव यांच्याबद्दलची कविता म्हणताना अजिंक्य देव यांचा कंठ दाटून आला आहे. काही दिवसांपूर्वी अजिंक्य देव यांनी वडील रमेश देव आणि आई सीमा देव यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोसह त्यांनी “आई बाबा दोघे ही गेले राहिल्या फक्त आठवणी… सुंदर गोड आठवणी” असं म्हटलं होतं. अशातच त्यांनी पुन्हा एकदा वडिलांच्या आठवणीत एक भावुक कविता सादर केली आहे. कवितेचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी असं म्हटलं आहे की, “ही कविता मी माझ्या वडिलांना अर्पण करत आहे”.
आणखी वाचा – वडील झाल्यानंतर प्रिन्स नरुलाचा आनंद गगनात मावेना, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, एकटक बघतच बसला अन्…
अजिंक्य देव यांनी सादर केलेले कविता :
वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा,
संपेल जे उद्यान आणि आहे सहारा यायचा…
याही सळी रेतीत मी फुलबाग आहे लावली,
इतकेच या इथे मी आज आता अबोली लावली…
गंधही आहे इथे, अबोलीही जरी आहे,
स्मृतींचा गंध इथे यांना जरी नसला…
तरी रिझवण्या येथेही आम्हा आहेत सोबती,
सोबती आहेत आसू, गतकाल आहे सोबती…
आसूसवे आज मी बागेत माझ्या विहरतो,
घेऊन जलभार जैसा व्योमी विहरतो…
शास्त्रातही जो स्पष्ट इतुका कुणी नाही सांगितला,
अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला…
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये प्रेमाचे वारे, ईशा-अविनाशचं फुलतंय नातं, जोडी जमणार का?
दरम्यान, सीमा देव आणि रमेश देव यांचे पूत्र अजिंक्य देव हेदेखील अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांनी हिंदी, मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘वहिनीची माया’, ‘माझे घर माझा संसार’, ‘जीवसखा’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘माहेरची साडी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.