शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डोळ्यात राग, आक्रमक अंदाज अन्…; अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लूक अखेर समोर, चाहतेही भारावले

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 21, 2023 | 2:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajay Devgan Singham Again first look out

डोळ्यात राग, आक्रमक अंदाज अन्…; अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक अखेर समोर, चाहतेही भारावले

बॉलिवूडमध्ये सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे अजय देवगनचा ‘सिंघम अगेन’. २०११ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले, ज्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट ‘सिंघम’ फ्रेंचायजीचा तिसरा चित्रपट, तर रोहित शेट्टी कॉप युनिव्हर्समधला पाचवा चित्रपट आहे. आतापर्यंत या चित्रपटातील अनेक कलाकारांचे फर्स्ट लुक चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, करीना कपूर यांच्यानंतर आता ‘बाजीराव सिंघम’ म्हणजे अभिनेता अजय देवगणचा फर्स्ट लूक नुकतंच समोर आला आहे. (Ajay Devgan Singham Again first look out)

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी या सर्व कलाकारांचा लुक समोर आला होता. अशातच आज मुख्य पात्र बाजीराव सिंघमचा फर्स्ट लुक समोर आला आहे. नुकताच चित्रपटातील कलाकारांनी अजयचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात तो नेहमीप्रमाणे आक्रमक अंदाजात दिसत आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यात एक वेगळं रुप पाहायला मिळत असून त्याच्याशेजारी सिंहाची झलकदेखील स्पष्टपणे दिसत आहे.

हे देखील वाचा – Goa International Film Festival 2023 : माधुरी दीक्षितचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये विशेष पुरस्काराने सन्मान, भारावून गेली अभिनेत्री

दरम्यान, चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं. ज्यात त्याने कॅप्शन देताना म्हटलं की, “शेर आतंक मचाता है, और जखमी शेर तबाही! तुम्हा सर्वांचा लाडका कॉप ‘बाजीराव सिंघम’ पुन्हा आला आहे. सिंघम अगेन!” त्याचबरोबर चित्रपटातील अन्य कलाकारांनीही अजयचं हे पोस्टर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. तसेच, त्याच्या या लूकवर चाहतेही भारावले असून अनेक जण कमेंटद्वारे त्याचं कौतुक करत आहे.

हे देखील वाचा – “माझ्या आयुष्यात एक राजकुमार आला”, नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची स्पेशल पोस्ट, म्हणाली, “खरोखरचं…”

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

रोहित शेट्टीच्या या बहुचर्चित चित्रपटात अजयसह करिना कपूर, टायगर श्रॉफ, रणवीर सिंह, अक्षय कुमार आदी कलाकार झळकणार असून यात धमाकेदार ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे. नुकतंच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून या शूटिंगचे अनेक फोटोज जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान, लवकरच या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट केला जाणार असून त्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अजयचा हा चित्रपट पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

Tags: ajay devganAjay Devgan Singham Again first look outbollywood moviessingham again
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Amol Kolhe Troll

अमोल कोल्हे 'ऑन ऍक्शन मोड', एसटीतून प्रवास केल्याने नेटकऱ्यांनी सुनावलं, म्हणाले, "निवडणुका आल्यामुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.