बॉलिवूडमध्ये आता स्टारकिड्सचा एक वेगळाच ट्रेंड सुरु झाला आहे. पार्टी असो वा एखाद्या कार्यक्रमाला जाणं असो स्टारकिड्स मंडळी नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे निसा देवगण. अजय देवगण व काजोलची लेक निसा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तसेच बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सबरोबर ती पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. तिचे यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
निसा सध्यातरी हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार नसल्याचं अजय व काजोल यांनी काही मुलाखतींमध्ये म्हटलं होतं. कलाक्षेत्राशी संबंध नसतानाही निसा कायमच लाइमलाइटमध्ये असते. म्हणूनच की काय तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. निसा एका पार्टीसाठी गेली होती. या पार्टीमधून बाहेर येत असतान पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं.
व्हायरल व्हिडीओमध्ये निसा कारपर्यंत चालत येताना धडपडत आहे. तसेच कारमध्ये बसत असताना तिचा तोल जातो. याचवरुन तिला आता ट्रोल करण्यात आलं आहे. याआधीही निसाचे असे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमध्ये ती मित्र-मंडळींबरोबर पार्टी करताना दिसत होती. तसेच दरम्यान “तू नशा करते का?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी निसाला विचारला होता.
आताही व्हायरल झालेल्या व्हिडीओ नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. नेहमीच दारूच्या नशेत असते, निसा दारू प्यायली आहे, निसा नाही ही नशा आहे, दारूच्या नशेमध्ये बुडालेली आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण आता निसा खरंच दारूच्या नशेमध्ये आहे का? हे कळू शकलेलं नाही.