अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेक वेगळे झाल्याच्या चर्चा कानावर येत होत्या. मात्र दोघांनीही या अफवांवर मौन बाळगलं असल्याचं दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या मुलगी आराध्याबरोबर दुबईत आहे. सिमा पुरस्कार सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी मायलेक दुबईला गेल्या आहेत. दुबईला जाताना दोघीही विमानतळावर स्पॉट झाल्या. या पुरस्कार सोहळ्यातील दोघींचे आता आणखी काही व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात लेक आराध्या तिच्या आईचा हात धरताना दिसत आहे. या मायलेकी रेड कार्पेटवर धमाल करताना दिसल्या. त्यांनी सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने तिच्या मुलीला रेड कार्पेटवर किस केले, त्याची क्लिपही व्हायरल होत आहे. (Aishwarya Rai Bachchan Daughter Video)
ऐश्वर्या राय व आराध्या अनेकदा एकत्र दिसतात. अभिनेत्रीने एकदा सांगितले होते की, तिला तिच्या मुलीची काळजी घेण्यासाठी कोणाचीही गरज नाही. ती एकटी व स्वतः तिच्या लेकीला हाताळू शकते. काही दिवसांपूर्वी ती दुबईमध्ये अभिषेक बच्चनबरोबर दिसली होती. पण दोघेही पूर्वीसारखे एकत्र दिसत नाहीत. अशा परिस्थितीत चाहत्यांना अनेकदा दोघांची काळजी वाटते. ऐश्वर्या व अभिषेकचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वेगळ्या होण्याच्या अफवांनी जोर धरला तेव्हा चाहतेमंडळींनी काळजी व्यक्त केलेली दिसली.
आणखी वाचा – Video : मायरा वायकुळला भाऊ झाल्यानंतर रुग्णालयात कुटुंबियांचा एकच जल्लोष, दीदी झाले म्हणत रडू लागली अन्…
सिमा पुरस्कार सोहळ्यातील ऐश्वर्या राय आणि आराध्याचे अनेक व्हिडीओ दुबईतून समोर आले आहेत. ज्यामध्ये कधी ऐश्वर्या मीडियाबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे, तर कधी आराध्या फोनवर तिच्या आईचा फोटो क्लिक करताना दिसत आहे. या दोघांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली आणि तिथे अभिनेत्रीने तिच्या मुलीला सर्वांसमोर किस केले. मायलेकींचा हा गोड व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत.
आराध्या आणि ऐश्वर्याला पाहून लोकांनी दोघींचे खूप कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, “मुलगी खूप गोंडस आहे”. तर आणखी एक म्हणाला, “ती खूप सुंदर आणि डाउन टू अर्थ अभिनेत्री आहे”. त्याचवेळी चाहत्यांनीही हार्ट ईमोजी शेअर करत लाईक्सचा वर्षाव केला. व्हिडीओ पाहून एकाने सांगितले, “आराध्या दिवसेंदिवस सुंदर होत आहे”. तर एका चाहत्याने म्हटले की, “ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहे”.