Aditi Rao Hydari and Siddharth Marriage : आदिती राव हैदरी व सिद्धार्थ याच्या नात्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत होती. दीर्घकाळापासून अदिती व सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये होते. मार्चमध्ये या जोडप्याने साखरपुडा केला तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते. अखेर या जोडप्याने गुपचूप लग्न केलं असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थबरोबरच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ आता विवाहित आहेत. या जोडप्याने गुपचूप लग्नगाठ बांधल्याचा खुलासा करत अभिनेत्रीने चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला.
इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अदिती व सिद्धार्थचा वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात दोघांचा विवाह झाला असल्याचं समजत आहे. “तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस. आयुष्यभराचा साथी बनण्यासाठी, हसण्यासाठी, कधीही दूर न जाण्यासाठी शाश्वत प्रेम, प्रकाश. श्री व सौ. अदू-सिद्धू”, असं तिने फोटोंना कॅप्शन दिलं आहे.
समोर आलेल्या अदिती व सिद्धार्थच्या फोटोंमध्ये लग्नातील त्यांचा खास पारंपरिक लूक लक्ष वेधून घेत आहे. दोघांचा हा पारंपरिक लूक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. इतकंच नव्हे तर अगदी जवळच्या कुटुंबियांच्या व नातेवाईकांच्या उपस्थितीत अदिती व सिद्धार्थने आशीर्वाद घेत लग्न केले. पारंपरिक अंदाजात त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी अदितीने सिम्पल अशी गोल्डन साडी, नथ, झुमके, बांगड्या घातल्या होत्या. तर सिद्धार्थ पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये वराच्या लूकमध्ये खूप खास दिसत होता.
आणखी वाचा – प्रथमेश लघाटेने बनवले मोदक, बायकोचा स्वयंपाकही त्याच्यासमोर फेल, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
या वर्षाच्या सुरुवातीला ‘वोग इंडिया’शी बोलताना अदितीने खुलासा केला की, तिने आणि सिद्धार्थने वानपर्थी येथील ४०० वर्षे जुन्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. “लग्न माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाच्या असलेल्या वानपर्थी येथील ४०० वर्ष जुन्या मंदिराभोवती केंद्रित असेल”, असे अदितीने सांगितले. अदिती व सिद्धार्थ २०२१ मध्ये तेलुगू चित्रपट ‘महा समुद्रम’च्या सेटवर भेटले होते. त्याच संभाषणात अदितीसमोर सिद्धार्थने लग्नाची मागणी घातली.