मनोरंजनाचा पडदा म्हणजेच रुपेरी पडदा हा विविध कलाकारांच्या कलेचा सन्मान नेहमी करत असतो. प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं कलाकाराचं स्वप्न हे कस पूर्ण झालं हे कलाकार सोबतच त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा चाहता वर्ग ही बघत आलेला असतो. प्रेक्षकांच्या मनात फक्त डोळ्यांच्या अदाकारीने राज्य करणारी अशीच एक अभिनेत्री आहे जिने तिच्या अभिनयाने, मेहनतीने प्रेक्षकांच्या मनात घर केले ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय. मिस वर्ल्ड म्हणून जगभरात मान मिळवणारी, बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या अभिनेत्रांच्या यादीत ऐश्वर्याचं नाव अगदी मानानं घेतलं जात.(Aishwarya Rai Rishi Kapoor)
स्वतःच्या आईने लिहिलेल्या दिल का रिश्ता या चित्रपटात पहिल्यांदा ऐश्वर्या ने काम केलं होत. पुढे १९९४ मध्ये मिस वर्ल्ड हा ‘किताब पटकवल्यानंतर एका पाठोपाठ एक एक येणारे ऐश्वर्याचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजन बाबतीचा एक अविभाज्य घटक होऊन गेले.फक्त हिंदी मधेच नाही तर इतर ५ भाषांमध्ये आपल्या कामाचा ठसा ऐश्वर्याने उमटवला. प्रसिद्ध दिगदर्शक मणी रत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून ऐश्वर्याने रुपेरी पडद्यावर पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर बॉलीवूडमध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून ऐश्वर्या आली आणि तिने जिकून घेतलं सार असं म्हणायला हरकत नाही.

ऐश्वर्या ने साकारलेल्या चित्रपटांपैकी अजरामर झालेलं पात्र म्हणजे देवदास या चित्रपटातील ‘पारो’. संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ, मिलिंद गुणाजी अशी तगडी स्टार कास्ट होती. अनेक पुरस्कारांचा मान या चित्रपटाने पटकावला होता. रोमँटिक चित्रपटतील ऐश्वर्याच्या बहुतांश भूमिका चांगल्याच गाजल्या. इंडस्ट्रीत काम करताना कुठेही मिस वर्ल्ड असल्याचा माज न बाळगता काम करणं हा ऐश्वर्याचा विशष गुण असल्याचं ललिता ताम्हणे यांनी त्यांच्या चंदेरी सोनेरी या पुस्तकात सांगितलं आहे.
म्हणून ऋषी कपूर ओरडले(Aishwarya Rai Rishi Kapoor)
कधी कधी काम करताना ऐश्वर्या इतकी साधी राहायची कि त्यामुळे प्रसंगी तिला दिगदर्शकाचा ओरडा ही खायला लागला होता. ऐश्वर्या सोबत असाच किस्सा घडला होता ‘ आ अब लौट चले’ या चित्रपटाच्या शूटिंग प्रसंगी अनावश्यक वाटणारे स्वतःचे संवाद कमी करण्याची ऐश्वर्याची सवय तिला महागात पडली होती.
====
हे देखील वाचा- ‘छान आणि सुखाचा संसार चाललाय आमचा’ म्हणत प्रियदर्शिनीने सांगितली तिच्या घराची गोष्ट
====
एका सीन दरम्यान ऐश्वर्याला ऋषी कपूर यांनी तुझे काही संवाद रिपीट होतायत असे सांगून काही संवाद कमी करू का असे ऐश्वर्याला विचारले तेव्हा तिने नेहमी प्रमाणे हो चालेल असे सांगितले त्यावेळी मात्र ऋषी कपूर ओरडत तिला म्हणाले असं स्वतःचे संवाद कमी करायला कोण सांगत? एखाद्या पात्राची त्यामुळे वाट लागू शकते, याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकत असा कोणावर सहज विश्वास ठेऊ नये या कारणांमुळे ऐश्वर्याला हा ओरडा खावा लागला होता. पुढे याच कारणामुळे राजकुमार संतोषी यांनी सुद्धा मला समज दिली होती असं ऐश्वर्याने ललिता यांना सांगितलं.