वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आपल्या सुंदर सौंदर्यांने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. अभिनयाबरोबर ऐश्वर्या या सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. प्रेक्षकांच्या कायमच सोशल मिडियावरून संपर्कात राहणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला. (Aishwarya Narkar Comment)
हटके फोटोशूट करत त्या नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय पती अविनाश नारकर यांच्याबरोबरचे अनेक रिल्स व्हिडीओ शेअर करत असतात. या वयात हटके रील व्हिडीओ बनवण्याच्या त्यांच्या या ऊर्जेला, त्यांच्या या उत्साहाला अनेकांनी दाद दिलेली पाहायला मिळाली. तर या वयात हे असले उपक्रम का करताय म्हणून बऱ्याच जणांनी त्यांना ट्रोलही केल. मात्र कोणत्याही ट्रोलिंगला न घाबरता न जुमानता त्या त्यांचा आनंद शोधत असतात. प्रत्येक वेळी ट्रोलर्सला सडेतोडपणे उत्तर देत त्या आपली बाजू मांडत असतात. बरेचदा त्या ट्रोलिंगकडे दुर्लक्षही करताना दिसतात.
सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या मालिकेतल्या भूमिकेचे ही सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनी निळ्या रंगाचा टीशर्ट व फ्लोरल शॉर्ट पॅन्ट परिधान करत स्वतःचा सेल्फी घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या सौंदर्याच कौतुक केले आहे.

यापैकी एका चाहतीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. या चाहतीने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुम्ही एकत्र कुटुंबात राहता सासू नणंद वगैरे, असं तुम्ही एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. खरचं का? तुमच्या सासरचे खूप समजूतदार आहेत आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा आहे वाटतं. आमच्याकडे तर भुवया वर होतील आणि डोळे बंद होतील” असं म्हटलं आहे. चाहतीच्या या कमेंटवर अभिनेत्रीने कमेंट करत असं म्हटलं की, “हो ते खूप समजूतदार आहेत. आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. कपड्यांचं काही नाही अहो. आपल्याला आरामदायी वाटणं महत्त्वाचं. या सगळ्यात कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो” असं त्या म्हणाल्या.