मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जुन्या पद्धतीचं घर, गायीचं दूधही काढलं अन्…; गावच्या मातीमध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 28, 2024 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pallavi Patil Home And Village

Video : जुन्या पद्धतीचं घर, गायीचं दूधही काढलं अन्…; गावच्या मातीमध्ये रमली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, साध्या राहणीमानाने वेधलं लक्ष

मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांसह काही ना काही अपडेट शेअर करत असतात. बरेचदा ही कलाकार मंडळी चाहत्यांसह त्यांच्या घराचे, गावाकडचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. चित्रीकरणातून ब्रेक घेत ही कलाकार मंडळी त्यांच्या गावी जात कुटुंबियांसह वेळ घालवतनाही दिसतात. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री तिच्या गावी धमाल, मस्ती करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे पल्लवी पाटील. पल्लवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Pallavi Patil Home And Village)

‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून अभिनेत्री पल्लवी पाटील घराघरांत पोहोचली. पल्लवीने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील पल्लवीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ही मालिका जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासूनच या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरली. गावाकडून मुंबईत येऊन आनंदीने कसा आपला संसार संभाळला, कशी माणसं जोडली हे पाहणं मालिकेत रंजक ठरलं.

आणखी वाचा – “मी २५०० पोस्ट हटवल्या पण…”, घटस्फोटाबद्दल होणाऱ्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडलं मौन, म्हणाली, “लोकं याकडे…”

View this post on Instagram

A post shared by Pallavi Patil (@officialpallavipatil)

मात्र मालिकेने निरोप घेतल्यानंतर पल्लवी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय झाली. अशातच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पल्लवी सध्या तिच्या गावी गेली असल्याचं पाहायला मिळत आहे. पल्लवी तिच्या गावी जाऊन धमाल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गावाकडील अनेक फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “मन गहिवरून जावं असं माझं छोटस गाव”.

आणखी वाचा – “घर घ्यायचं त्याच रात्री ठरवलं अन्…; नवीन घर घेतल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “चार वर्ष कष्ट…”

पल्लवीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती कैरी खाताना, भेळ खाताना दिसत आहे. गावी जाऊन पल्लवीने गायीचे दूधही काढले आहे. शिवाय तिच्या भव्य अशा घराची झलकही या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. जुन्या आणि या आलिशान घराच्या पारंपरिक स्वयंपाक घराने अधिक लक्ष वेधलं. शिवाय पुरणपोळी खाताना आणि मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतानाही ती दिसली. ट्रॅक्टरवर बसून गावात फिरतानाही अभिनेत्री या व्हिडीओत दिसली. या व्हिडीओमध्ये गावातील नयनरम्य दृश्ये पाहायला मिळत आहेत. पल्लवीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत लाईक्स व कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. पल्लवी ही खानदेशातील मुलगी आहे. खान्देश हे पल्लवीचे गांव आहे.

Tags: marathi actressmarathi serialpallavi patilPallavi Patil Home And Village
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Rashmi Anpat's new serial 'Antarpat' is coming on Colors Marathi channel.

लग्न लागताच मागितला घटस्फोट; नव्या मराठी मालिकेची घोषणा होताच प्रोमोने वेधलं लक्ष, कथेमध्ये काय नाविन्य असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.