शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकमुळे ऐश्वर्या नारकर त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाल्या, “पैसा, वेळ, शक्ती सगळंच…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 6, 2024 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar is stuck in the traffic on Thane Ghodbunder Road shared video on Instagram know more

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ट्राफिकमध्ये अडकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडीओ दाखवली परिस्थिती

ठाण्यातील घोडबंदर रोड हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून रोज लाखोंच्या संख्येत वाहनांची ये-जा होत असते. याच मार्गावरुन मुंबई, पालघरसह गुजरातमध्ये जाणाऱ्या गाड्यांची ये-जा सुरु असते. अत्यंत महत्वाच्या या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सामान्य जनतेसह मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकरांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबद्दल अनेक मराठी कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनीही या वाहतूक कोंडीवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Aishwarya Narkar is stuck in the traffic)

ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या स्टोरीद्वारे त्यांनी ठाणे-घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दाखवून दिली आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “काय करायचं या ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकचं. आता तर मी प्रेमात पडायलं लागले आहे. रस्ता न होण्यामागे आणि ट्राफिक असण्यामागे प्रत्येकाची बाजू असेल. सरकारची बाजू असेल, राजकारण्यांची बाजू असेल किंवा ज्यांना कंत्राट मिळतं त्यांची बाजू असेल”.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “बुक्कीतच मुंडी छाटेन” वैभवने सूरज चव्हाणला डिवचलं, तोही भडकला, म्हणाला, “हात लावून तर बघ”

यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “यात कामगारांची बाजू असेल. तिथे काम करणाऱ्या सर्वांची, तसंच ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांची एक बाजू असेल. पण आपली पण एक बाजू आहे आणि ती बाजू  कुणीतरी समजून घेतली पाहिजे. पैसा, वेळ, शक्ती, निराशा, वेळेत पोहोचण्याचं टेन्शन या सगळ्यासाठी आता आपली बाजू समजून घेणं गरजेचं आहे” असं म्हटलं आहे. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ठाणे-घोडबंदर रोडवरील प्रचंड मोठी वाहतूक कोंडी दिसत असून लांब लांबपर्यंत वाहनांच्या  रांगा दिसत आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा संपन्न, Ex-boyfriend म्हणत शेअर केले फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

काही दिवसांपूर्वी अभिनेता शशांक केतकरनेदेखील या मार्गावरील वाहतूक कोंडीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. शशांकने हा व्हिडीओ शेअर करत “मीरारोड आणि ठाण्याच्या मध्ये लोणावळ्याचा फील येण्यासाठी ही ट्रॅफिकची योजना आखली आहे” असं शशांकने उपरोधिकपणे म्हटलं होतं. अशातच आता ऐश्वर्या यांनीही या वाहतूक कोंडीची समस्या मांडली आहे. दरम्यान, दरम्यान, ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्या सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत      

Tags: aishwarya narkarmarathi entertainment newsThane Ghodbunder Road Traffic News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss marathi season 5 vaibhav chavan and irina rudakova love

निक्की-अरबाजनंतर आता Bigg Boss Marathiच्या घरात नवं कपल, इरिनाच्या प्रेमात वैभव वेडापीसा, व्हिडीओमध्ये दिसली जवळीक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.