शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकेमधून ब्रेक घेत पाचगणीत नवऱ्यासह फिरायला गेल्या ऐश्वर्या नारकर, निसर्गरम्य वातावरणात नारकर कपलची धमाल, सुंदर व्हिडीओ समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 25, 2024 | 10:09 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya and Avinash Narkar gone for a trip to Pachgani they shared some special photo video on social media.

मालिकेमधून ब्रेक घेत पाचगणीत नवऱ्यासह फिरायला गेल्या ऐश्वर्या नारकर, निसर्गरम्य वातावरणात नारकर कपलची धमाल, सुंदर व्हिडीओ समोर

सुट्टी म्हणजे अनेकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. सगळ्या सुट्ट्यांचा राजा म्हणजे मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी. सगळ्यांनाच हवीहवीशी वाटणारी उन्हाळ्याची ही सुट्टी अनेकार्थानं खास असते. मे महिन्याच्या सुट्टीत कुठे फिरायला जायचं, याचं प्लॅनिंग कित्येक महिने आधीच झालेलं असतं. कलाविश्वातीलही अनेक कलाकार मंडळीही त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी बाहेर जात असतात आणि या सुट्ट्यांचे काही खास क्षण ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे मे महिन्यातील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला गेले आहेत. ऐश्वर्या व अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन क्षेत्रात गेले अनेक वर्ष काम कररत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर अविनाश यांच्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यामुळे दोघांनी त्यांच्या व्यस्त वेळातून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पाचगणी येथे गेले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – नेत्राला देवीआईचा संकेत, पाचव्या पेटीपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड, तर रुपालीला पुन्हा विरोचकाकडून नवी शक्ती मिळण्याची शक्यता

ऐश्वर्या यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे या ट्रीपचे काही खास क्षण शेअर केले असून या व्हिडीओमधून त्यांनी ते राहत असलेल्या ठिकाणचा एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “आम्ही मुंबईच्या धावपळीपासून काही दिवस शांतता मिळावी म्हणून या ठिकाणी आलो आहोत. आम्ही चार दिवसांच्या या ट्रीपवर आलो असून इथून लोकांशी संवाद साधत आहोत.”

आणखी वाचा – ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये लीला-ऐजेच्या नात्यात गोंधळ, तर दुसरीकडे मालिकेत नव्या अभिनेत्याची एन्ट्री, कथेला नवं वळण

दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर हे त्यांच्या अभिनयाने जितके चर्चेत राहत असतात, तितकेच ते सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात, हे दोघेही त्यांचा व्यायाम करताना, फिरताना, मजा-मस्ती करतानाचे सर्व फोटो व व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि चाहत्यांकडूनही त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून प्रतिसाद मिळत असतो.

Tags: aishwarya narkaravinash narkarmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Arbaj Khan Wife Sshura Khan On Age

अरबाज खानबरोबर लग्न केल्यानंतर लोकांनी वयावरुन हिणावलं, आता त्याच्याच बायकोने दिलं उत्तर, म्हणाली, "वय हे फक्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.