सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अरबाज खानबरोबर लग्न केल्यानंतर लोकांनी वयावरुन हिणावलं, आता त्याच्याच बायकोने दिलं उत्तर, म्हणाली, “वय हे फक्त…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 24, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arbaj Khan Wife Sshura Khan On Age

अरबाज खानबरोबर लग्न केल्यानंतर लोकांनी वयावरुन हिणावलं, आता त्याच्याच बायकोने दिलं उत्तर, म्हणाली, "वय हे फक्त..."

बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अरबाज खान व शूरा खान. अरबाज व शूरा सध्या खुलेपणाने त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी दोघांनी आपलं नातं गुपित ठेवलं असलं तरी आता ते उघडपणे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अलीकडेच शूरा खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतले. यादरम्यान तिने पती अरबाज आणि स्वत:मधील वयातील फरकाबाबत विचारलेल्या प्रश्नालाही समर्पक उत्तर दिले. (Arbaj Khan Wife Sshura Khan On Age)

‘आस्क मी एनीथिंग’ सत्रादरम्यान, एका यूजरने शूरा खानला तिचा पती अरबाज खानच्या वयाबद्दल आणि उंचीबद्दल विचारले, ज्यावर तिने स्पष्टपणे उत्तर दिले. “अरबाज खान ५.१० फूट आहे. मी ५.१ फूट आहे आणि वय फक्त एक संख्या आहे”. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज खान ५६ वर्षांचा आहे तर त्याची पत्नी शूरा खान ३५ वर्षांची आहे. सत्रादरम्यान शूरा खानने सांगितले की, अरबाज खानने तिला सर्वप्रथम प्रपोज केले होते. शूराने सांगितले की, ‘पहिली तारीख इतकी चांगली होती की त्यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला’.

आणखी वाचा – मालिकेमधून ब्रेक घेत पाचगणीत नवऱ्यासह फिरायला गेल्या ऐश्वर्या नारकर, निसर्गरम्य वातावरणात नारकर कपलची धमाल, सुंदर व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by sshura Khan (@sshurakhan)

याआधी अरबाज खानने स्वत: आणि शूरा खान यांच्या वयातील अंतराबाबत सांगितले होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “माझी पत्नी माझ्यापेक्षा खूपच लहान आहे. पण ती १६ वर्षांची आहे असे नाही. तिला तिच्या आयुष्यात काय हवं आहे ते माहीत होतं आणि मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे ते माहीत होतं. हे आम्हाला माहित नव्हते किंवा आम्ही ते एकमेकांपासून लपवले असे काही नाही”.

आणखी वाचा – अर्जुनच्या वहिनीने अप्पीला पाठवले घटस्फोटाचे पेपर्स, दोघांमध्ये होणार का गैरसमज?, एकमेकांपासून दूर होणार

अरबाज खानचे शूरा खानबरोबर हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अरबाज खानने मलायका अरोराबरोबर लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. १९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर अरबाज खान आणि मलायका अरोरा २०१७ मध्ये वेगळे झाले. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान खान असे आहे.

Tags: Arbaj Khan shura Khanarbaj khan wife on their ageArbaj Khan Wife Sshura Khan On Ageentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Aishwarya and Avinash Narkar talk about trolling on them through social media.

"वयाचं भान ठेऊन काही उपयोग नाही", नवऱ्यासह डान्स करण्यावरुन बोलणाऱ्यांची ऐश्वर्या नारकरांनी केली बोलती बंद, म्हणाल्या, "हवं तसं जगणं..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.