‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व विशेष गाजताना दिसत आहे. यंदाच्या पर्वातील एका धक्कादायक एलिमिनेशनची विशेष चर्चा रंगली. ते म्हणजे कमी मत मिळाल्याने अरबाज पटेलला घराबाहेर जावं लागलं. उत्तम खेळ खेळणाऱ्या अरबाजचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास लवकर संपला. अरबाजची निक्कीबरोबरची मैत्री अगदी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाली. अनेकदा वाद होऊनही त्यांनी एकमेकांची साथ बिलकुल सोडली नाही. (leeza bindra on arbaaz patel)
निक्की व अरबाजची जवळीक ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात त्याची बाहेर गर्लफ्रेंड असून तो कमिटेड असल्याचं साऱ्यांना माहित आहे. अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा आहे. लिझा अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर सातत्याने पोस्ट करताना दिसली. अरबाजनेही सर्वांसमोर तो कमिटेड असल्याची कबुली दिली. तर एकीकडे लिझानेही अरबाजबरोबर नात्यात असल्याचं खुलेपणाने सांगितलं.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi १०० नव्हे तर ७० दिवसांचा असणार, शोकडून मोठी घोषणा, सगळ्यांनाच नॉमिनेट केलं अन्…

बिग बॉसच्या घरात निक्की व अरबाज एकत्र गेम खेळत होते, या प्रवासात दोघांमध्ये जवळीक वाढली. हे पाहून लिझाने अनेक पोस्ट शेअर करत निक्कीची कानउघडणी केली. शिवाय वेळोवेळी ती अरबाजची बाजू घेतानाही दिसली. अशातच लिझाने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “या जगात काहीही पर्मनंट नाही, अगदी त्रासही नाही”, अशी पहिली स्टोरी लीझाने पोस्ट केली. लीझाने यापूर्वीही अरबाजबद्दल त्याचे नाव न घेता अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?
पुढे तिने दुसरी स्टोरी शेअर केली, ज्यात तिने पोलीस तक्रारीचा उल्लेख केला आहे. “तुम्हाला पोलीस तक्रारीचा अर्थ समजतो का? तुम्ही सगळे मला त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करायला सांगत आहात, का करु? कशासाठी करु? नाही मला नाही करायची पोलीस तक्रार. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतेय की तो चुकीचा माणूस नाही. कृपया त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा”, अशी स्टोरी लीझाने पोस्ट केली आहे.