बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi १०० नव्हे तर ७० दिवसांचा असणार, शोकडून मोठी घोषणा, सगळ्यांनाच नॉमिनेट केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2024 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi Season 5

'बिग बॉस'कडून मिळाला घरातील सदस्यांना मोठा धक्का, आठही स्पर्धक झाले नॉमिनेट

Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वादग्रस्त शोपैकी एक असणाऱ्या या रिऍलिटी शोने साऱ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यंदाच्या बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची विशेष चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. २८ जुलैला या पर्वाचा ग्रँड प्रीमियर अगदी दणक्यात पार पडला आणि तब्बल १६ सदस्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला होता. तर एका वाईल्ड कार्ड स्पर्धकानेही घरात एंट्री केली. सध्या घरात ८ सदस्य उरले आहेत. आणि या ८ सदस्यांपैकी कोणता स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

काही दिवसांतच ‘बिग बॉस’प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. आता त्यानंतर ‘बिग बॉस’ने केलेल्या घोषणेने साऱ्यांना खूप मोठा धक्का दिला आहे. अखेर ‘बिग बॉस’ने यासंदर्भात अधिकृतरित्या घोषणा केली आहे. सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावत ‘बिग बॉस’ने सदस्यांना खूप मोठा धक्का दिला. यंदाचा सीझन हा १०० दिवसाचा नसणार असल्याचं सांगत साऱ्यांना धक्का दिला. ते ऐकून स्पर्धकांसह आता प्रेक्षकांनाही काय सुरु आहे याची उत्सुकता लागून राहिली.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की व अभिजीतमध्ये जोरदार भांडण, दोघांनीही मैत्री तोडली, पण नेमकं झालं तरी काय?

यावेळी ‘बिग बॉस म्हणाले, “यंदाचा सीझन ब्लॉकबस्टर ठरला आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा या सीझनने बाजी मारली आहे. क्रिकेटमध्ये आधी टेस्ट मॅच व्हायच्या. कालांतराने एकदिवसीय सामने तर आता सर्वत्र टी-२० ची क्रेझ निर्माण झाली आहे. अगदी याचप्रमाणे या सीझनबाबत ‘बिग बॉस’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा सीझन १०० दिवसांचा नसेल. शंभर दिवसांऐवजी हा सीझन फक्त १० आठवड्यांचा म्हणजेच एकूण ७० दिवसांचा असेल”.  यंदा ‘बिग बॉस’ने कोणताही नॉमिनेशन टास्क न घेता सगळ्या आठ सदस्यांना थेट नॉमिनेट केलं आहे. आता महाअंतिम सोहळा जवळ आल्याने सगळ्या सदस्यांना नॉमिनेट करण्याचा निर्णय ‘बिग बॉस’कडून घेण्यात आला आहे

आणखी वाचा – लेकीवर जीवापड प्रेम करतात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे, मुलगी दिसते इतकी सुंदर, म्हणाले, “खूप प्रेम…”

बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. ६ ऑक्टोबरला यंदाच्या पर्वात कोणता स्पर्धक बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आजच्या दिवसापासून ग्रँड फिनालेला केवळ १४ दिवस शिल्लक असल्याचंही ‘बिग बॉस’ने सर्व सदस्यांना सांगितलं.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5colors marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Vidisha Mhaskar on Akshay Shinde Encounter Case

Akshay Shinde Encounter प्रकरणावर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “खऱ्या आयुष्यातील सिंबा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.