छोट्या पडद्यावरील मालिकांमधील लोकप्रिय जोड्या या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. मालिका सुरु असताना तर प्रेक्षक या जोड्यांवर भरभरून प्रेम करताना दिसतात. याशिवाय मालिका संपल्यावरही या जोडयांना काही प्रेक्षकवर्ग विसरत नाही. अशीच एक छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेत्री सायली संजीव व ऋषी सक्सेना. सात वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत शिव व गौरीची प्रेमकहाणी दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांकडून या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल दीड वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Sayali Sanjeev And Rishi Saxena)
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे सायली संजीव व ऋषी सक्सेना. या मालिकेतून शिव व गौरी ही पात्र साकारत ही जोडी लोकप्रिय झाली. मालिकेतील गौरी व शिवची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर या जोडीला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असलेले पाहायला मिळाले. तब्बल सात वर्षांनी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार असल्याचं समोर आलं आहे. सात वर्षांनी सायली व ऋषी एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सायलीने ऋषीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सात वर्षांनी एकत्र शूटिंग असं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ही जोडी लवकरच मोठा पडदा गाजवायला सज्ज होणार आहे. आता पुन्हा प्रेक्षकांची ही लाडकी जोडी एकत्र आली आहे. सायली व ऋषी ‘समसारा’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे.

सायली व ऋषीला पुन्हा एकदा एकत्र आणि मोठ्या पडद्यावर काम करताना पाहणं त्यांच्या चाहत्यांना रंजक ठरणार आहे. या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी या कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत.