छोट्या पडद्यावरील मालिकांमधून कित्येक कलाकारांचे चेहरे नावारुपाला आले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मराठी मालिकांमध्ये तिने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तिची ‘होणार सून मी या घरची’ मालिका तर विशेष गाजली. या मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवीची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेदरम्यान तेजश्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आताही असंच काहीसं घडलं आहे. तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेमधील तिचं मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरत आहे. (Premachi Goshta Mukta Sagar Wedding)
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री मुक्ता ही भूमिका साकारत आहे. मालिकेमध्ये आता मुक्ताचं सागरशी लग्न झालं आहे. मुक्ता-सागरच्या संगीत, हळद व लग्न समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मालिकेत अनेक ट्विस्ट आल्यानंतर अखेर मुक्ता-सागरचं लग्न पार पडलं. लग्नानंतर मुक्ताचा लूक कसा असणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
नुकतंच मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. यानिमित्त सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याचबरोबर प्रेक्षकांसह गप्पा मारण्यासाठी मालिकेतील सर्वच कलाकार इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह आले होते. या व्हिडिओमध्ये मुक्ताचा नवा लूक पाहायला मिळाला. या नव्या लूकमध्ये तिच्या मंगळसूत्राने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मुक्ताच्या गळ्यातील हे मंगळसूत्र अगदी युनिक आहे. त्याचबरोबर तिने नेसलेली साडी लक्षवेधी ठरत आहे.
याआधी तेजश्री ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील तिच्या मंगळसूत्रामुळे चर्चेत आली होती. त्या मालिकेतही तिच्या मंगळसूत्राने ट्रेंड सेट केला होता. तर आताही मुक्ताचं हे नवं मंगळसूत्र ट्रेंड सेट करेल असं म्हणायला हरकत नाही. या इन्स्टा लाईव्ह गप्पांमध्ये सागर, मुक्ता आणि नकारत्मक भूमिकेत पाहायला मिळणारी सावनी या तिघांचा ऑफस्क्रीन मैत्री किती छान आहे हे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन एकमेकांचा द्वेष करणारे हे तिघं सेटवर अगदी एकत्रित राहत असल्याचं पाहायला मिळालं.