बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्र भूषण’ अन् सराफ कुटुंबात आनंद; आईवडिलांसह स्वामी समर्थांचेही घेतले आशीर्वाद, मामांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2024 | 2:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar

'महाराष्ट्र भूषण' अन् सराफ कुटुंबात आनंद; आईवडिलांसह स्वामी समर्थांचेही घेतले आशीर्वाद, मामांच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष

सिनेसृष्टीत सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची. यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देऊन गौरविण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार मंगळवारी जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. सर्वस्तरावरून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. (Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar)

अशोक सराफ यांच्या या खास क्षणाचं जंगी सेलिब्रेशन त्यांच्या राहत्या घरी करण्यात आलं. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर ‘इट्स मज्जा’ने नुकतीच अशोक सराफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या या खास क्षणाचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. यावेळी सराफांच्या घरी आनंद पसरलेला पाहायला मिळाला. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी पतीचे औक्षण करत त्यांचे आशीर्वाद घेतलेले पाहायला मिळाले. शिवाय या आनंदा प्रसंगी अशोक सराफ यांची मोठी बहीणही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळताच अशोक सराफांच्या राहत्या घरी साजरा होतोय खास क्षण, पत्नी व मोठ्या बहिणीने केलं औक्षण अन्…

दरम्यान, अशोक सराफ यांचं त्यांच्या मोठ्या बहिणीनेही औक्षण केलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर अशोक सराफ व निवेदिता यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीचे आशीर्वाद ही घेतले. या खास क्षणाला अशोक सराफ यांनी त्यांच्या आई वडिलांचेही आशीर्वाद घेतले. पत्नीसह त्यांनी आई वडिलांच्या फोटोला हार घालत त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवाय त्यांनी स्वामींच्या फोटोलाही हार घालत स्वामींचे आशीर्वाद घेतले. एकूणच अशोक सराफ यांच्या घरी आनंद पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याची खास पोस्ट, रोमॅंटिक फोटो शेअर केला अन्…; म्हणाला, “माझ्या आयुष्यातील..”

यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराचे मानकरी अशोक सराफ ठरताच अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी व राजकीय नेते मंडळींनीही अशोक सराफ यांचं भरभरून कौतुक केलं आहे. मराठी मनोरंजन विश्वाबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या मामांनी साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

Tags: ashok sarafashok saraf awardashok saraf on parentsentertainmentmarathi actornivedita saraf
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Mannara chopra react on munawar faruqui kiss allegation and she wants apology see the details

गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, "त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.