‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. मात्र या चित्रपटातील जय श्री राम या गाण्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. येत्या १६ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. अशातच आदिपुरुष चित्रपटाच्या टीमने प्रमोशनला सुरुवात केल्याचं समोर आले आहे. (Om Raut Kisses Kriti sanon)
‘आदिपुरुष’ चित्रपटाची संपूर्ण टीम तिरुपती येथे चित्रपटाच्या प्रीरिलीज इव्हेंटसाठी गेली होती. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटी स्टेडियम येथे हा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमाला प्रभास, क्रिती सेनन, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्माता भूषण कुमार यांनी उपस्थिती लावली होती. या प्रमोशनच्या वेळेला अभिनेत्री क्रिती सेनन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी श्री व्यंकटेश्वरा मंदिरात दर्शन घेतलं. त्यावेळच्या एका व्हिडीओने चित्रपटाच्या प्रमोशनच्या सुरुवातीला गालबोट लावलं आहे.
पाहा नेमकं काय घडलं क्रिती सेननसोबत (Om Raut Kisses Kriti sanon)
अभिनेत्री क्रिती सेनन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत हे व्यंकटेश्वराच्या मंदिरात गेले होते, थेथून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरच क्रिती आणि ओम राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एकमेकांना निरोप देत क्रिती आणि ओम राऊत यांनी एकमेकांना मिठी मारली. दरम्यान ओम राऊत याने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं आणि त्यांनतर तो क्रितीला गॉड ब्लेस यू असं देखील म्हणाला.(Om Raut Kisses Kriti sanon)
हे देखील वाचा – ‘फायनली’ धकधक गर्ल माधुरी थिरकलीच
या व्हिडिओनंतर आंध्र प्रदेशचे भाजपचे राज्य सचिव रमेश नायडू नागोथू यांनी एक ट्वीट शेअर करून क्रिती आणि ओम राऊत यांच्या या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी असं कृत्य करणं कितपत योग्य आहे? तिरुमालाच्या मंदिरासमोर अशी मिठी मारणे आणि किस करणे हे अजिबात चालण्यासारखं नाही आहे. हे ट्विट केल्यानंतर मात्र काही वेळाने त्यांनी हे ट्विट डिलीटही केलं. या व्हिडिओनंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी क्रिती सेनन आणि ओम राऊत यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.(Om Raut Kisses Kriti sanon)
हे देखील वाचा – मराठ्यांच्या पराक्रमाची तेजस्वी गाथा ‘रामशेज’ रुपेरी पडद्यावर
आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास हा रामच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाची भूमिका साकारणार आहे.
