अनेक कलाकार नेहमी चर्चेत असतात त्यांच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. सध्या असाच एक चर्चेचा विषय आहे तो महाराष्ट्राचा लाडका अभिनेता असलेला दत्तू मोरे. दत्तू ने नुकतंच कुठे ही गाजावाजा न करता त्याच लग्न आटोपलं. संपूर्ण महाराष्ट्राला हे कळेपर्यंत दत्तूचा लग्न सोहळा पार देखील पडला आणि त्या नंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. काही चाहत्यांनी न सांगता लग्न केलं त्यामुळे नाराजी व्यक्त केली तशीच दत्तूच्या सहकाऱ्यांची देखील ही बातमी समजल्यावर काय रिअक्शन होती हे दत्तू ने इट्स मज्जाने केलेल्या कास केळवणाच्या भागात केलं आहे.(Dattu More Wedding News)
दत्तूने सांगितलं त्याने लग्नाच्या २ दिवस आधी ही बातमी समीर चौघुले, नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्याशी शेअर केली. नम्रता ने ही बातमी ऐकून काय सांगतोस अशी रिअक्शन देत त्याच अभिनंदन केलं तर पुढे दत्तू म्हणाला वनिता ही बातमी ऐकून मोठ्याने किंचाळली. आजूबाजूच्या कंटेनर पर्यंत वनिताचा आवाज गेला असेल असं हि दत्तू ने सांगितलं.
दत्तूने सांगितलेली हि बातमी ऐकून सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं मात्र समीरचा मात्र त्याला ओरडा खावा लागला. समीर दत्तूला ” उद्या लग्न आणि एवढ्या उशिरा कोण सांगत”. महाराष्ट्रच्या हास्य जत्रेतील दत्तूचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे विराज जगताप. सेट वर दत्तूच्या लग्नाची सगळ्यात पहिली बातमी विराज जगताप सोबत शेअर केली होती हे देखील दत्तू ने सांगितलं.(Dattu More Wedding News)
हे देखील वाचा – “समाज काय म्हणेल….” म्हणून दत्तूच्या घरात मान्य न्हवत लव्हमॅरेज! वाचा तरीही कस जुळलं या दोघांचं नातं
तसेच दत्तूच्या लग्नाला हास्यजत्रेतील ओंकार भोजने, गौरव मोरे त्यांच्यासह अन्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती.