मराठी कलाविश्वात बांदेकर कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर हे दोघेही गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या अभिनयशैलीने सुचित्रा व आदेश यांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सिनेसृष्टीतील आदर्श जोडीच्या यादीत सुचित्रा व आदेश यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सुचित्रा व आदेश यांच्या पावलावर पाऊल टाकत आता त्यांचा लेकही सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करत आहे. सोहम बांदेकरनेही सिनेसृष्टीत आपली जागा मिळवायला सुरुवात केली आहे. (Soham Bandekar On Wedding)
‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहमने मालिकाविश्वात पदार्पण केले. याशिवाय सोहम ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही पाहुणा कलाकार म्हणून दिसला. सोशल मीडियावर सोहम बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. बरेचदा हे बांदेकर कुटुंब एकत्र एकमेकांसह वेळ घालवतानाही दिसतात. अशातच सोहम अधूनमधून सेशन घेत चाहत्यांच्या संपर्कातही राहत असतो. अशातच सोहमने नुकताच ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यावेळी सोहमच्या चाहत्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांवर सोहमने भन्नाट उत्तर दिली आहेत.

सोहमला एका नेटकऱ्याने “पुण्याचा जावई व्हायला आवडेल का?”, असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्याने मिश्किलपणे उत्तर देत “मी एवढं पुण्य नाही केलं आहे”, असं म्हटलं आहे. याआधी सुद्धा एका नेटकऱ्याने “तुला लग्नासाठी कशी मुलगी हवी”, असा प्रश्न सोहमला विचारला होता. यावर त्याने “कशीही चालेल फक्त आईला आवडली पाहिजे”, असं उत्तर दिलं होतं.
सध्या सोहम त्याच्या ‘सोहम प्रॉडक्शन’च्या कामात व्यस्त आहे. सध्या त्यांची ‘ठरलं तर मग’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिका सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी ‘घरोघरी मातीच्या चुली’ या नवीन मालिकेच्या लॉन्च सोहळ्यावेळी सोहम बांदेकर व त्याच्या आई-वडिलांना सुद्धा त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. तसेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या लगीनघाई सुरु आहे. यावेळी ही निर्माता म्हणून सोहम उपस्थित होता तेव्हा त्याला ‘इट्स मज्जा’ने लग्न कोर्ट मॅरेज करणार का?, की अरेंज मॅरेज?, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत त्याने, कोर्ट मॅरेज करणार असल्याचा खुलासा केला.