एखाद्या बद्दल अफवा पासून लागली कि ती थांबायचं नाव घेत नाही. असच काहीस घडलंय अभिनेत्री दीपिका कक्कर सोबत. सगळीकडे दीपिका अभिनय थांबवण्याच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आला होतं. दीपिका गरोदर आहे आणि बाळंतपणा नंतर तिने अभिनय थांबवणार असल्याचं सांगितलं आहे असं बोललं जातंय. पण या सगळ्या चर्चांवर आता खुद्द दीपिकानेच उत्तर दिल आहे.(Dipika Kakar)
पलटण सारख्या हिंदी चित्रपटातून तसेच बहुतांश ससुरालं सिमर का आणि बऱ्याच हिंदी मालिकांमधून दीपिकाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण काही दिवसांपूर्वी ती अभिनय थांबवणार असल्याचं बोललं जात होतं. या गोष्टीवर पडदा टाकत दीपिका म्हणाली “मला हि आताच समजलं आहे कि मी अभिनय सोडणार आहे”.

लोकांनी माझ्या जुन्या मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढला. मला एका गृहिणी सारखं आयुष्य जगायचं आहे हे मान्य पण याचा अर्थ असा नाही कि मी अभिनय सोडणार आहे. माझं बाळ जन्माला आल्या नंतर कदाचित २ किंवा ३ वर्षे मला काम करता येणार नाही पण त्या नंतर चांगल्या कामाची ऑफर आली तर मी नक्की स्वीकारेन. त्यामुळे या अफवांवर कोणी विश्वास ठेऊ नका असं हि दीपिकाने सांगितलं.