अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी या दोघांनी ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. स्वानंदीने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली. स्वानंदी व आशिष यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली देत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काचं दिला. त्यानंतर दोघांनी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा उरकला. (Swanandi And Ashish Kelvan)
स्वानंदी व आशिषच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून बरेच व्हायरल झाले होते. त्यावेळी स्वानंदीने इंस्टाग्राम अकाउंटवरून लवकरच आम्ही लग्न करणार आहोत अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. स्वानंदी व आशिष यांची ही लगीघाई सुरु झालेली पाहायला मिळतेय. त्यांच्या लग्नाच्या आधी हे दोघेही केळवणासाठीही सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच त्यांचे काही केळवणाचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत.
स्वानंदीने ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई’ या मालिकेत अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासह काम केले होते. या मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येत स्वानंदी व आशिषचं केळवण केलं आहे. याचे फोटो स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंसह कॅप्शन देत स्वानंदी म्हणाली आहे की, “हे पहिलं केळवण होतं, आता लाईन लागलीचं.” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत. स्वानंदीच्या पहिल्या केळवणाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत.
स्वानंदीने मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहेच, तर आशिषने अनेक रिऍलिटी शो मधून आपल्या आवाजाच्या जादूने चाहत्यांची मन जिंकली आहेत. स्वानंदी छोट्या पडद्यावर जितकी सक्रिय असते तितकीच तिला गायनाची आवड देखील आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तर आशिषने त्याच्या गायनातून ‘सारेगमप’, ‘इंडियन आयडॉल’ हे रिऍलिटी शो गाजवले आहेत.