शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणची वाहवा तर जान्हवीची सुप्रसिद्ध अभिनेत्रीने काढली खरडपट्टी, म्हणाल्या, “हिलाच विजयी घोषित करा कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2024 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
surekha kudachi on Bigg Boss Marathi season 5

सूरज चव्हाणच कौतुक तर जान्हवीला खडेबोल, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Bigg Boss Marathi season 5 :  ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ सुरु झाल्यापासून याची सर्वत्र एक वेगळीच हवा पाहायला मिळत आहे. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकार मंडळींनाच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर, रॅपर, गायक अशा विविध क्षेत्रातील कलेला मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. यंदाच्या या पर्वातील चर्चेत असलेला एकमेव स्पर्धक म्हणजेच सूरज चव्हाण. टिक टॉकच्या दुनियेत पहिल्या दहाच्या यादीत असलेल्या सूरजला ‘बिग बॉस मराठी’ने खूप मोठी संधी दिली आहे. सूरजच्या यंदाच्या पर्वातील खेळाने महाराष्ट्राला वेड केलं आहे. सूरजने जपलेल्या माणुसकीचं सर्व महाराष्ट्र कौतुक करत आहे तर काही स्पर्धकांनी माणुसकीच गमावली म्हणून त्यांना ट्रोल केलं जातं आहे. माणुसकी गमावलेल्या स्पर्धकांमध्ये एक नाव म्हणजे जान्हवी किल्लेकर. प्रेक्षकांच्या मनात जान्हवीबद्दल राग दिसत आहे. सोशल मीडियावर ही जान्हवीला बऱ्यापैकी ट्रोल केलं गेलं.

अशातच सूरजला पाठिंबा देण्यासाठी आणि जान्हवीला सल्ला देण्यासाठी एका मराठमोळ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ सीजन ३ च्या स्पर्धक लावणीक्वीन सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर केली आहे. जान्हवीला तिच्या उद्धट स्वभावामुळे त्यांनी चांगलेच खडे बोल लगावले आहेत. ‘बिग बॉस’च्या तिसर्‍या पर्वामध्ये घरामध्ये स्पर्धक म्हणून लावण्यवती आणि विविध मालिकांमधून खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची यांना पहायला मिळालं.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

सुरेखा कुडची यांनी लावणीच्या माध्यमातून आपला कलाक्षेत्रातील प्रवास सुरु केला असला तरी गेल्या दोन दशकांमध्ये विविध मालिका आणि मराठी चित्रपटांतून त्या आपल्याला खाष्ट सासूच्या भूमिकेमध्ये पहायला मिळाल्या आहेत. अशा या मालिकाविश्वातील खाष्ट सासूने जान्हवीला सुनावलं असून सूरजला आईची माया दिली आहे. सुरेखा यांनी पहिली पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजचा एपिसोड पाहिला. पॅडीला हार्ट नाही दिलं हे जरा चुकीच नाही वाटलं का?. असो पण सूरज. वाह तू म्हणालास की आईची कमी भासते. मुलांना जन्म दिल्या नंतर आई गेली तर त्या मूलांना आईच प्रेम नाही मिळत. मी समजू शकते तुझ्या भावना. तुझं बोलण ऐकत असताना तिथे येऊन तुला मायेन जवळ घ्याव असं वाटलं. तू आज मन जिंकलस. कायम असंच रहा आणि खूश रहा”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : पोरांसमोर मिरवतात, तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांनाही पश्चाताप होत असेल; वर्षा उसगांवकरांना नको नको ते बोलली जान्हवी, प्रेक्षकांचा संताप

View this post on Instagram

A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

तर पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “जान्हवी की कोण आहे ती तिला तर विजयी घोषित करा. कारण घरातील सोडून बाकी मुर्ख, बेअक्कल, निर्लज, बिनडोक आहेत. सगळ्यांना ती घराबाहेर काढणार म्हणते तिला बिग बॉस यांनी विशेष अधिकार दिलेत का?. शी”. पुढे आणखी एक पोस्ट शेअर करत त्यांनी, “नादी लागू नका, खोटारड्या, मुलांसमोर केस उडवत येण, घाणेरडी एक्टिंग, घाणेरड तोंड, ओवर एक्टिंग, पुरस्कार देणाऱ्याला पच्छाताप होत असेल वर्षा उसगांवकरला का घेतलं म्हणून. अशी भाषा चालते?. मराठी माणूस ते खपऊन घेईल?. आजचा क्लायमॅक्स”, असं म्हणत कडक शब्दात जान्हवी किल्लेकरची शाळा घेत वर्षा उसगांवकर यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Tags: bigg boss marathi season 5jahnavi killekar trollsurekha kudachi on bigg boss marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Khushboo Tawde Exit from sara kahi tichyasathi

खुशबू तावडेकडे गुडन्यूज, दुसऱ्यांदा गरोदर असल्यामुळे 'सारं काही तिच्यासाठी'ला रामराम, म्हणाली, "आठवा महिना सुरु आहे आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.