‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. अनेक हिट सिनेमांचे रेकॉर्डब्रेक करत या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या सहा अभिनेत्रींचं सगळीकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. अभिनयासोबतच या सहा अभिनेत्रीनं चित्रपटाच्या प्रमोशनलाही हातभार लावला. चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच जण चित्रपटाचे कौतुक करत आहेत. दरम्यान सुकन्या मोने यांच्या एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Sukanya mone reply to fan)
बाईपण भारी देवा या चित्रपटात सुकन्या मोने यांनी साधना हे पात्र साकारलं आहे. या पात्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने ही बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्याल्यानंतर सुकन्या मोनेंसाठी अमृताने खास भेटवस्तू पाठवली आहे. अमृताने पाठवलेल्या भेटवस्तूचा छान असा व्हिडीओ सुकन्या मोने यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी, कित्ती छान, तुझ्या सुकुताईला…. तायडे ला, एकदम खूश केलंस…. किती सुंदर आहे हे सगळ… असं कौतुक करणार विरळच… असेच प्रेम कायम असू दे. असं कॅप्शन दिल आहे.
पाहा चाहतीच्या प्रश्नावर काय म्हणाल्या सुकन्या मोने (Sukanya mone reply to fan)
सुकन्या मोनेंच्या या पोस्टखाली एका महिलेने कमेंट केली आहे. “तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं ऐकून”, अशी कमेंट एका महिला चाहतीने केली आहे. त्यावर सुकन्या मोनेंनी प्रतिक्रिया देत सडेतोड उत्तर दिले आहे. “सॉरी कोणी सांगितले मी non veg खाते?आणि कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हे सुध्दा ज्याचे त्याने ठरवायचे असते. मी शाकाहारी आहे”, असे सुकन्या मोनेंनी म्हटले आहे.
हे देखील वाचा – ‘बाईपण भारी देवा’ची Success Party; कलाकारांचा हटके डान्स होतंय व्हायरल
दरम्यान सुकन्या मोने यांच्या या कमेंटवर अनेकजण त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या बाईपण भारी देवा चित्रपटातील भूमिकेचं कौतुक करताना दिसत आहेत.
