Shah Rukh Khan Dunki Movie Review : शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटाने सर्वत्र हवा केली आहे. हा चित्रपट आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये ‘पठाण’ आणि सप्टेंबरमध्ये ‘जवान’ चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो मुंबईच्या प्रतिष्ठित सिंगल स्क्रीन थिएटर येथे सकाळी ५.५५ वाजता सुरु करण्यात आला. शाहरुख खानच्या चाहत्यांना खात्री आहे की, त्याचा हा नवा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरेल.
शाहरुखच्या चाहत्यांनी केलेल्या चित्रपटाच्या ओपनिंगचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुख खानच्या फॅन क्लबने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, चाहत्यांनी अक्षरशः ढोल ताश्यांच्या गजरात चित्रपटाचं स्वागत केलं. चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या प्रेमाने व उत्साहाने भारावून गेलेल्या, शाहरुखने ट्विटरवरुन खास पोस्ट शेअर केली. “धन्यवाद मित्रांनो व मैत्रिणींनो. हा खूप चांगला चित्रपट आहे. आशा आहे की ‘डंकी’द्वारे तुम्हा सर्वांचे मनोरंजन होईल” अशा आशयाची पोस्ट शाहरुखने चाहत्यांसाठी शेअर केली आहे.
डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यात तापसी पन्नू, विकी कौशल व बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. डंकी चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिरानी व कनिका धिल्लन यांनी केले आहे. मनू, सुखी, बुग्गू व बल्ली या चार मित्रांची हृदयस्पर्शी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
डंकी चित्रपट पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. एका युजरने चित्रपट पाहिल्यावर कमेंट करत, “काय चित्रपट आहे. मला चित्रपट खूप आवडला. राजकुमार हिरानी, धन्यवाद, शाहरुख खानला माझ्यासारख्या जुन्या चाहत्यांसाठी परत आणल्याबद्दल” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘पठाण’ व ‘जवान’ पेक्षा उत्तम कलाकृती असल्याचं म्हटलं आहे. कॉमेडियन सुनील पाल हे देखील शाहरुख खानचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी देखील डंकी चित्रपटाचा पहिला शो चित्रपटगृहात जाऊन पाहिला. चित्रपट पाहिल्यावर ते म्हणाले की, “डंकी हा चित्रपट २,००० कोटी रुपयांची कमाई करणार. गमतीत ते असंही म्हणाले की, “जादुगार हिरानीसाठी एक हजार कोटी आणि बाजीगर शाहरुख खानसाठी एक हजार कोटी”असंही ते म्हणाले.