सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका वेबसीरिजची जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे रवि जाधव दिग्दर्शित “ताली” ही वेबसीरिज. या वेबसीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मुख्य भूमिकेत आहे. तर अनेक मराठी कलाकारांनी यात महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेता सुव्रत जोशीने यामध्ये तृतीयपंथीची भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. एकीकडे सोशल मीडियावर सुव्रतच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. अशातच अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी जावयासह अन्य कलाकार, तंत्रज्ञाचे भरूभरून कौतुक केले आहे. (shubhangi gokhale on suvrat joshi)
शुभांगी गोखले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी जावई सुव्रत जोशीसह अभिनेत्री सुश्मिता सेन, दिग्दर्शक रवी जाधव आणि अन्य कलाकार व तंत्रज्ञाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी वेबसीरिजचा पोस्टर शेअर करत म्हणाल्या, “श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित “ताली” ही वेबसिरीज जिओ सिनेमावर दाखल झालीये.. कमाल.. पेपर, बातम्या, टीव्ही, मुलाखतींमधून श्री गौरी यांना जाणून होतेच. क्षितीज पटवर्धन, किती नीटसपणे, नेमकं आणि परिणामकारक लेखन केलं आहेस. हेमांगी, ऐश्वर्या, नंदू माधव, शीतल, कृतिका आणि सुव्रत तुमची कामं फार फार आवडली. दिग्दर्शक रवि जाधव “one more feather in his cap” आणि सुश्मिताजी, तुम्ही “चपखल” हा शब्द जिवंत केला आहे. Doing a role च्या पलीकडे being a role काय ताकदीने दाखवलं आहे तुम्ही. एव्हाना मराठी चांगलंच शिकला असाल, त्यामुळे एवढंच म्हणेन, “चाबूक” झालंय काम!!! श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यासारखंच.”
हे देखील वाचा – ‘सैराट’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचं निधन, भावुक होत म्हणाली, “आई आज तुला जाऊन…”
शुभांगी गोखलेंच्या या पोस्टवर जावई सुव्रत जोशीने कमेंटद्वारे आभार मानले आहे. सुव्रत म्हणाला, “तुझ्याकडून कौतुकाची थाप मिळाली, बास आणखी काय हवं? तुला आवडली याचा विशेष आनंद आहे.” तर दिग्दर्शक रवि जाधव आणि लेखक क्षितिज पटवर्धननेही शुभांगी गोखलेंच्या आभार मानले आहे. याआधी पत्नी सखी गोखलेने सुव्रतच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
हे देखील वाचा – Video : जावईबापूंचा मानपान, सासूबाईंची खास तयारी अन्…; अधिकमासात सासरवाडीत प्रविण तरडेंचे लाड, पत्नीने शेअर केला व्हिडीओ
दिग्दर्शक रवि जाधव यांची “ताली” वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. १५ ऑगस्ट रोजी ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. (shubhangi gokhale on suvrat joshi role in taali web series)