श्रेया बुगडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्रींनपैकी आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमाची कॉमेडी क्वीन म्हणून श्रेयाला लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमातील सरपंचाची भूमिका श्रेया नेहमीच साकारत असते. आणि तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते.
सोशल मीडियावरही श्रेयाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आणि श्रेया तिचे अपडेट नेहमीच चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असते. अशातच श्रेयाने शेअर केलेल्या नव्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रेया व्हॅकेशनसाठी गेली असून तिने समुद्रकिनाऱ्यावरील काही खास अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.(Shreya Bugde vacation Mode)
श्रेयाने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोशूटमध्ये, तीने जांभळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे. आणि समुद्र किनाऱ्यावर पोज देताना ती दिसत आहे. एका फोटोत ती पुस्तक वाचत बसलेली दिसतेय आणि सुट्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. पांढऱ्या रंगच्या सनग्लासेस मध्ये श्रेयाचा लूक ग्लॅमरस दिसतोय, तिने पोस्टला कॅप्शन देत लिहिलं आहे की, “endless summer
पहा अनेकांनी केली श्रेयाच्या फोटोशूटवर कमेंट (Shreya Bugde vacation Mode)
श्रेयाचा हा समर लूक पाहून चाहते खूश झाले. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तिच्या सौंदर्याची प्रशंसा केलेली पाहायला मिळतेय. काहींनी श्रेयाच्या या फोटोशूटवर गमतीशीर कमेंट केल्या आहेत, एका नेटकऱ्याने श्रेयाचा जांभळ्या रंगाचा ड्रेस पाहून बैंगन बीच पर क्या कर राहा है अशी गमतीशीर कमेंट केली आहे.(Shreya Bugde vacation Mode)
याआधी श्रेयाने केलेल्या पारंपारिक हातमागाच्या साडीत केलेल्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली होती. तिच्या या पारंपारिक वेशातील फोटोशूटने श्रेयाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली पाहायला मिळाली. मराठी इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी श्रेयाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. अभिनेता स्वप्नील जोशीने कमेंट करत लिहिलंय “गॉर्जियस”, तर मराठी गायिका कीर्ती किल्लेदार त्रिवेदी यांनी लिहिल आहे, “नजर ना लागे”.
हे देखील वाचा – प्राजक्ता माळीच बोल्ड फोटोशूट होतयं वायरल
२०१२ मध्ये तिने ‘तू तिथे मी’ या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केल आहे. त्यानंतर, श्रेया ‘अस्मिता’, ‘फू बाई फू’ यासारख्या कार्यक्रमातही दिसली.