दुहेरी मालिकेतून संकेत-सुपर्णा प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांच्या सोशल मीडियावरून ते एकमेकांना डेट करत असल्याबद्दल त्यांनी प्रेक्षकांना सांगितले.एकमेकांसोबतचे बरेच व्हिडिओ फोटोज ते शेअर करत असतात.काही महिन्यांपूर्वी संकेतने सुपर्णाला हटके अंदाजात लग्नासाठी विचारले. त्याच्या या प्रपोजचे फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर वायरल झाले.एकमेकांसोबतचा फोटो शेअर करून अँड इट्स अ येस असं कॅप्शन देत त्याने ही बातमी प्रेक्षकांसोबत सोबत शेअर केली होती.(Sanket Suparna First Vatpoornima)
या वर्षी पार पडलेल्या विवाह सोहळ्यांमध्ये संकेत आणि सुपर्णाच्या लग्नाची विशेष चर्चा होती. पुण्यातील प्रतिशिर्डी येथील एका राजवाड्यात त्यांच्या विवाहसोहळा संपन्न झाला.२२ एप्रिल २०२३ रोजी संकेत सुपर्णा विवाहबंधात अडकले. लग्नाची थीम त्यांचे लग्नातले लूक्स हे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. या जोडीला कलाकरांसोबतच प्रेक्षकांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्या. संकेत सुपर्णाच्या लग्नात अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी विशेष हजेरी लावली होती.
पाहा कशी साजरी केली संकेत-सुपर्णाने त्यांची पहिली वटपौर्णिमा?(Sanket Suparna First Vatpoornima)
नुकतीच वटपौर्णिमा पार पडली. अनेक कलाकारांची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. लग्ननंतरची सुपर्णाची देखील यावर्षीची ही पहिली वटपौर्णिमा होती.पंरतु सुपर्णाने तिची ही वटपौर्णिमा अगदी वेगळ्या अंदाजात साजरी केलेली पाहायला मिळते. सुपर्णाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून तिच्या वटपौर्णिमेचा व्हिडिओ शेअर केला आहे, सुपर्णाने वडा ऐवजी संकेतला च्या फेऱ्या मारत आहेत.तिच्या या व्हिडिओला तिने ‘माईन फॉर ७ जन्म ये वाला जन्म तो बुक हो गया अब नेक्स्ट ६ जन्म i have lock you with me माय फर्स्ट वटपौर्णिमा’ असं कॅप्शन दिल आहे. खूपच क्युट जोडी आहे अशा कमेंट करून प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.(Sanket Suparna First Vatpoornima)
हे देखील वाचा : संकेत-सुपर्णाच्या लग्नातील खास क्षण- निवेदिता झाल्या भावुक
लग्ना नंतर संकेत सुपर्णा कोचीला फिरायला देखील गेले होते.त्यांच्या या ट्रिपचे देखील फोटोज व्हिडिओज शोषलं मीडियावर चांगलेच चर्चेत होते. तसेच संकेत सध्या स्टार प्रवाह वरील लग्नाची बेडी या मालिकेत राघव ही भूमिका साकारताना पाहायला मिळतो आहे.