शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिवानी सोनार व अंबर गणपुळेची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 6, 2025 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shivani sonar and ambar ganpule  wedding

शिवानी सोनार व अंबर गणपुळेची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो

shivani sonar and ambar ganpule  wedding : मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मराठी कलाकार एकापाठोपाठ लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. रेश्मा शिंदे, वैष्णवी कल्याणकर, किरण गायकवाड, हेमल इंगळे, कौमुदी वल्होकर या कलाकार मंडळींनी अगदी थाटामाटात लग्नसोहळा उरकला. यापाठोपाठ सिनेविश्वातील आणखी एक क्युट कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता अंबर गनपुळे आणि अभिनेत्री शिवानी सोनार. अंबर व शिवानी यांची लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांनी लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याची झलक शेअर केली आहे. लग्नाआधीच्या विधीचे फोटो शिवानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

शिवानी सोनारने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देत तिने असे लिहिलं होतं की, “नवरी होण्यास तयार”. या फोटोमध्ये शिवानीने ऑफ व्हाइट रंगाची साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली लावून मराठमोळा लूक केला होता. यानंतर अभिनेत्रीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये जातं, पाटा-वरंवटा, खलबत्ता याची पूजा केलेली पाहायला मिळत आहे. शिवानीने शेअर केलेल्या याच फोटोवरुन लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाली असल्याचं कळतंय.

आणखी वाचा – दिस सरले! हेमंत ढोमे-क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना Unseen Video व्हायरल, म्हणाला, “आमचं प्रेम…”

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिल २०२४ला शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. त्यांच्या शाही साखरपुडा समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. साखरपुड्यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. लग्नाआधी तिच्या केळवणाला सुरुवात झाली असल्याचंही समोर आलं. घरच्यांनी साजरं केलेलं केळवणचे फोटो शिवानीने सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. या केळवणासाठी शिवानीच्या घरच्यांनी चमचमीत पदार्थांचा बेत केल्याचे दिसून आलं. केळवणाच्या जेवणात मांसाहारी जेवणाचाही समावेश असल्याचे पाहायला मिळालं.

आणखी वाचा – “जर अभिनेत्री नसती तर?…”, चाहत्याचा जुई गडकरीला थेट प्रश्न, जुई उत्तर देत म्हणाली, “मोठ्या ब्रँडमध्ये…”

शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी Bride To Be Party आणि Groom To Be Partyचे फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. आता अंबर व शिवानी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: mareathi celebrityShivani Sonar and Ambar Ganpuleshivani sonar and ambar ganpule  wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Sandhya Naidu Shocking Revelation

"दिवसा आई बोलायचे आणि रात्रीची ऑफर देऊन…", सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.