बॉलिवूडमधील लाडकी अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सारा आणि विकी एकत्र पाहायला मिळणार आहेत. प्रमोशनच्या काळात विकी आणि सारा वेगवेगळ्या शहरात फिरत आहेत. अशातच सारा अली खानने उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेतले व पूजा केली. यावरून साराला खूप ट्रोल करण्यात आलं आहे. या ट्रोलर्सना मात्र साराने सडेतोड उत्तर दिलं, आणि आता त्यानंतर आता विकी कौशलनेही या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.(Sara Ali Khan Troll)
साराचे वडील सैफ अली खान मुस्लीम आहे तर तिची आई अमृता सिंह हिंदू आहे. त्यामुळे सारा मंदिरात गेल्यावर तिला कायम ट्रोल केलं जातं. यावेळी जेव्हा सारा ट्रोल झाली तेव्हा तिने एका मुलाखती दरम्यान वाचा फोडली. सारा म्हणाली, ‘मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते. तुम्हाला माझे काम आवडत नसेल तर मला वाईट वाटेल पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मी ठरवेल.’
‘ज्या भक्तिभावाने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आणि मी तिथे जात राहीन. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू देत, मला काही अडचण नाही. माझ्यासाठी, एखाद्या ठिकाणची ऊर्जा महत्त्वाची असते. मी ऊर्जेवर विश्वास ठेवते”(Sara Ali Khan Troll)
हे देखील वाचा – ‘अंकिता तू स्वार्थी आहेस’ सुशांतच्या चाहत्यांनी केला राग व्यक्त
साराला ट्रोल केल्यानंतर आता चित्रपटातील तिचा सहकलाकार विकी कौशलने यावर भाष्य केलेलं एका वृत्तवाहिनीने सांगितलंय. विकी कौशल याबद्दल म्हणाला आहे की, “खरं तर याबद्दल ट्रोलर्सना तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजेत. मीडिया जेव्हा अशा गोष्टी कव्हर करते, म्हणून ट्रोलर्सची हिंमत वाढते. सारा अली खानला हवा तो धर्म मानण्याचा पूर्ण अधिकार आहे.(Sara Ali Khan Troll)
‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा अली खानबरोबर अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट आज २ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहून मालिकेत रंजक ठरेल.
