शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नव्या वर्षात सई ताम्हणकर साकारणार सावित्रीबाई फुले यांची भूमिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, “त्यासाठीची तयारी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 7, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saie Tamhankar New Role

नव्या वर्षात सई ताम्हणकर साकारणार सावित्रीबाई फुले यांची भूमिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, "त्यासाठीची तयारी..."

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. विविधांगी भूमिका साकारत सईने तिचा असा स्वतःचा चाहतावर्गही तयार केला आहे. अभिनयाच्या जोरावर तर सईने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. याशिवाय हटके फोटोशूटमुळे ही ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही हटके फोटोशूट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Saie Tamhankar New Role)

हटके फोटोशूटमुळे सई बरेचदा ट्रोलही झाली आहे. बरेचदा अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली आहे. काही वेळेला अभिनेत्रीने नेटकऱ्यांच्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं आहे तर कित्येकदा नेटकऱ्यांच्या कमेंटला सडेतोड उत्तरही दिलं आहे. नेटकऱ्यांच्या कचाट्यात अभिनेत्री अडकली तरी तिने अभिनयावर त्याचा काही प्रभाव पडू दिला नाही. अभिनयात सईने कायमच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

आणखी वाचा – प्रसाद ओकच्या नव्या घरात मंगेश देसाईसह मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती, पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या अन्…

नवीन वर्षात कोणती महत्त्वाकांक्षी भूमिका साकारायची असा प्रश्न सईला विचारला असता, अभिनेत्री म्हणाली, “आजवर सईने विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र आताच्या या नव्या वर्षात सईला नेमकी कोणती भूमिका करायची इच्छा आहे याबाबत नुकत्याच मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान तिने भाष्य केलं. सैल माझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रत्येक स्क्रीनवर मी विविधांगी काम करताना दिसेन” असं अभिनेत्री म्हणाली.

आणखी वाचा – “लग्नानंतरची पहिली मैफिल”, मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे या नववधूवराची कामाला सुरुवात, फोटो पोस्ट करत म्हणाले, “एकत्र…”

सई पुढे म्हणाली, “मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट. वेबसीरिज व टेलिव्हीजनवरही मी असणारच आहे. माध्यम कोणतंही असो; सातत्यानं काम करत राहायचंय. वर म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकवेळी नवीन ‘सई’ तुम्हाला दिसेल. काही चरित्रभूमिका मला साकारायच्या आहेत. त्यासाठीची तयारी मी करतेय. एक भूमिका मला प्रचंड खुणावतेय ती म्हणजे; सावित्रीबाई फुले. त्यांचा चरित्रपट करायला मला आवडेल” असंही ती म्हणाली.

Tags: entertainmentmarathi actresssaie tamhankarsaie tamhankar new rolesaie tamhankar upcoming project
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post

Bigg Boss 17 : 'फॅमिली वीक'मध्ये कुटुंबियांना पाहून स्पर्धक भावुक, 'बिग बॉस'च्या घरात पोहोचली विकी जैनची आई, म्हणाली, "मी सोडणार नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.