Shubhangi Atre Gets Emotional : अभिनेत्री शुभांगी अत्रे हिने ‘भाभी जी घर पर है’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कस्तुरी’, ‘चिडिया घर’ या मालिकांमधून तिच्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. करिअरची पहिली काही महिने तिच्यासाठी कठीण होती. अभिनेत्री व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयत्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. तिने पतीसह फेब्रुवारीमध्ये घटस्फोट घेतला आणि त्यानंतर एप्रिलमध्ये पियुश पुरी यांचे निधन झाले. एका मुलाखतीत अभिनेत्री याबद्दल बोलली आणि त्या दरम्यान भावनिक झाली. ‘विरल भयानी’च्या टीमसह बोलताना शुभंगी अत्रे हिने पूर्वाश्रमीचा पती पियुश पुरीच्या मृत्यूबद्दल उघडपणे भाष्य केले.
अभिनेत्री म्हणाली की, “ही घटना खूप दुर्दैवी होती, पण नशेच्या आहारी गेल्यामुळे ते घडले. डॉक्टरांनी खूप आधी सांगितले होते की जर त्यांनी त्यांची जीवनशैली बदलली नाही तर हे घडू शकते. मला माहीत होते की, हे असे काहीतरी घडणार आहे, पण अशी घटना इतक्या लवकर घडेल अशी कल्पना नव्हती”.
शुभांगी अत्रे पुढे म्हणाली, “मला त्याला सर्व चांगल्या गोष्टींसाठी लक्षात ठेवायचे आहे. मी त्याच्यावर प्रेम करत होते आणि कदाचित मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही. मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपायच्या आहेत आणि आजही मी म्हणते की आशीला आशीर्वाद देत राहा. आम्हा दोघींना मार्गदर्शन करत राहा”. शुभांगी आणि पियुश यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते आणि १९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्री शुभांगी अत्रेचा पूर्वाश्रमीचा पती पियुष याचे यकृत संबंधित रोगामुळे एप्रिलमध्ये निधन झाले. अंगुरी भाभी म्हणाले होती की, अल्कोहोलच्या व्यसनामुळे त्यांचे संबंध खराब झाले. सुधारण्यासाठीही रेब पाठविण्यात आले पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि त्याने स्वतःचा जीव घेतला. अभिनेत्री मुलीला अधिक प्राधान्य देते आणि यामुळे ती दुसर्याशी लग्न करणार नाही. घटस्फोट घेण्याच्या अभिनेत्रीचा हा निर्णयही लेकीसाठीच होता, कारण पियुशच्या व्यसनामुळे ती मुलीचे भविष्य धोक्यात घालू शकत नव्हती.





