एखादी गोष्टी वादाच्या भोवऱ्यात एकदा अडकली कि ती अडकतच जाते असाच काही पाहायला मिळतंय ट्रॅक मेहता का उलट चष्मा या कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यां सोबत. आधी तारक मेहता ही भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढ़ा यांनी आधी हा कार्यक्रम सोडला. त्यांनी शो सोडल्या नंतर अनेक कलाकारांनी या कार्यक्रमातून माघार घेऊन निर्मात्यांवर अनेक आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर लैगिंग शोषणाचे आरोप केले होते. आता आणखी एका महिलेने निर्मात्यांवर आरोप केले आहेत अशी माहिती समोर आली आहे.(TMKOC Producers Controversy)
तारक मेहता का उलट चष्मा या कार्यक्रमात बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियानेही निर्मात्यावर अनेक आरोप केलेत.सोबतच तिने दिशा ने हा कार्यक्रम का साडीला याचे ही सप्ष्टीकरण दिले आहे. कार्यक्रमाचे निर्माते सेट वर प्रत्येक महिलेशी असंच वागतात. दिशा सोबतही ते असं वागलं असतील. या दोन्ही महिला कलाकारांच्या आरोपा सोबतच मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने असेच आरोप केले आहेत.

मालिकेत रिटा रिपोर्टर ची भूमिका साकारलेली अभिनेत्री प्रिया अहुजानेही निर्माते असित मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने या गाष्टींबद्दल स्पष्टीकरण देत या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाला मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. माझ्या बाबतीतही असेच झाले. प्रियाचे पती या मालिकेचे दिगदर्शक होते त्यानी ही मालिका सोडल्या नंतर प्रियाला ही मालिकेतून न सांगता काढण्यात आले/. या संदर्भात तिने पुन्हा विचारले असता या गोष्टी बाबत निर्मात्यांकडून टाळा टाळ करण्यात आली.(TMKOC Producers Controversy)
हे देखील वाचा – तारक मेहताच्या सेटवर अभिनेत्रीच लैंगिक शोषण निर्मात्यां विरोधात कोर्टात धाव
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेच्या निर्मात्यांवर होणाऱ्या आरोपांवर काही कारवाई होणार का याबाबत जाणून घेणं रंजक ठरणार आहे.