शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

४९व्या वर्षी ३४ मुलींची आई आहे प्रिती झिंटा, जुडवा मुलांनाही दिला जन्म, मुलींना परदेशामधून भेटायलाही येते अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2024 | 1:07 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Preity Zinta On Adoptetion

४९व्या वर्षी ३४ मुलींची आई आहे प्रिती झिंटा, जुडवा मुलांनाही दिला जन्म, मुलींना परदेशामधून भेटायलाही येते अन्...

बॉलिवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटा तिच्या चाहत्यांची मनं जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. अभिनेत्रीने ‘दिल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कभी अलविदा ना कहना, ‘कल हो ना हो’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून तिने चाहत्यांच्या मनात घर केले. प्रितीने २०१६ मध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. लग्नाच्या पाच वर्षानंतर, या जोडप्याने सरोगसीद्वारे जय व जिया या जुळ्या मुलांचे स्वागत केले. पण लग्नाआधीच प्रीती झिंटा ३४ मुलांची आई बनली. (Preity Zinta On Adoptetion) 

प्रीती झिंटा नेहमीच अतिशय साधे व सरळ आयुष्य जगते. हिंदी चित्रपटांमध्ये ती एक जबरदस्त अभिनेत्री असली तरी तिला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अभिनेत्रीच्या वयाच्या १३व्या वर्षी तिचे वडील दुर्गानंद झिंटा कार अपघातात मृत्युमुखी पडले आणि तिची आई गंभीर जखमी झाली. ती १५ वर्षांची असताना तिच्या आईचेही निधन झाले. त्यानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम केले.

आणखी वाचा – “१३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध…”, ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांचे IAS पत्नीवर गंभीर आरोप, म्हणाले, “ती वेगळ्या…”

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

अभिनेत्री असण्याबरोबरचं प्रीती झिंटा अनेक प्रकारची सामाजिक कार्ये देखील करते, ज्याद्वारे ती वंचित महिला आणि मुलांना मदत करते. मात्र, २००९ मध्ये तिच्या ३४व्या वाढदिवशी प्रितीने स्वत:ला एक सुंदर भेट दिली होती. दिवाने ऋषिकेश येथील मदर मिरॅकल अनाथाश्रमातील ३४ अनाथ मुलींना तिने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एका आघाडीच्या दैनिकाला दिलेल्या जुन्या मुलाखतीत प्रिती झिंटाने ३४ अनाथ मुलींना दत्तक घेण्याबाबत सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले की, ती या ३४ मुलींच्या संपूर्ण संगोपनाची काळजी घेईल, ज्यात त्यांचे शिक्षण खर्च, जेवण, कपडे आणि बरेच काही समाविष्ट आहे.

आणखी वाचा – ऐकावं ते नवलंच! बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडूनच रणवीर सिंह बाळाला सांभाळण्याचे घेत आहे धडे, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

या गोंडस मुलांबद्दल बोलताना प्रिती म्हणाली की, “त्यांचे बोलणे ऐकून तिला खूप भरून येते. तिने या ३४ मुलींना आपली मुलं आणि आपली जबाबदारी म्हटलं आहे. वर्षातून दोनदा ती त्यांना भेटायलाही जाते”. प्रितीने सांगितले की, “ती आगामी काळात आणखी मुले दत्तक घेणार असून या ३४ मुलींना दत्तक घेणे ही तिच्यासाठी फक्त सुरुवात आहे.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रितीने तिच्या इन्स्टा हँडलवर पती जीन गुडइनफबरोबर एक सेल्फी पोस्ट केला होता. फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने खुलासा केला की ते सरोगसीद्वारे जय व जिया या दोन सुंदर जुळ्या मुलांचे पालक झाले असून अभिनेत्रीने तिच्या संपूर्ण प्रवासात मदत करणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांचेही आभार मानले.

Tags: bollywood actressentertainmentPreity ZintaPreity Zinta On Adoptetion
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
jayaprada movie incidence

सीनदरम्यान अभिनेत्याने बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह अधिकच जवळीक साधली अन्…; सहन न झाल्याने कानाखालीही मारली तेव्हा…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.