Prajakta Mali On Her Films काही कलाकारांमध्ये अभिनयसोबतचं इतर कलाही असतात. आणि अशा अष्टपैलू कलाकारांमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव नक्कीच घेतलं जात.प्राजक्ताने तिच्या सहज, सुंदर अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं.प्राजक्ता कायमच तिच्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.(Prajakta Mali On Her Films)
अभिनेत्री, नृत्यांगना,कवियत्री आणि आता उद्योजिका असे अनेक गुण प्राजक्ता मध्ये पाहायला मिळतात. मालिका, चित्रपट, वेबसीरीज अशा प्रत्येक माध्यमांत प्राजक्ताने तिच्या कामाची छाप पाडली आहे. कोणत्या ही एका प्रकारात अडकून न राहता सोज्वळ नायिका, कॉमेडी भूमिका, खलनायिका अशा विविध रूपात प्राजक्ता पाहायला मिळाली.आणि प्रत्येक भूमिकेसाठी प्राजक्ताला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.तितकीच लोकप्रियता मिळाली.
पाहा काय म्हणाली प्राजक्ता? (Prajakta Mali On Her Films)
प्राजक्तला एका मुलाखती मध्ये प्रश्न विचारण्यात आला, सुरुवातीला काम मिळवणं,मिळालेलं काम टिकवून ठेवणं, आणि नवीन काम मिळवणं या तिन्ही स्टेजमधला तुझा काय अनुभव आहे? उत्तर देताना प्राजक्ता म्हणाली, “नशिबाने अशी कधी वेळ नाही आली की माझ्याकडे काम नाही आहे. मी आजपर्यंत जितकं काम केलं आहे कदाचित त्यापेक्षा जास्त काम मी नाकारलं आहे.कामाची कमतरता नाही जाणवली परंतु, चित्रपटांच्या बाबतीत अजून मला हवं तस काम मिळालं नाही.म्हणूनच कदाचित माझा कोणताही चित्रपट सुपरहिट झाला नाही.किंवा मालिका, नृत्य यामध्ये मी बराच वेळ घालवला का? किंवा मी कोणत्याही ग्रुपचा भाग नाही आहे,मला खोटं वागता येत नाही, माझ्या चेहऱ्यावर सगळं दिसत किंवा मी एव्हरेज अभिनेत्री असेन.अशी अनेक कारण असू शकतात.”

हे देखील वाचा : “…आणि ते मला भिकारी समजले”, ‘ताली’मध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “भीक मागण्यासाठी…”
पुढे प्राजक्ता म्हणाली ,”काम मिळतं पण जसं हवं आहे तस काम मिळवण्यासाठीची धडपड सतत सुरु असते.एकदा एक काम मिळालं की त्याच आकर्षण कमी होतं,मग नवीन कामाची ओढ लागते.त्यामुळे महत्वकांक्षा व समाधान याचा समतोल राखता येणं महत्वाचं आहे.” प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते.(prajakta mali movies)