मराठी सिनेसृष्टीमधील गुणी अभिनेत्रीनं मध्ये जिचं नाव घेतलं जात ती म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत.क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजाने मराठी सिनेसृष्टी मध्ये पदार्पण केले. अभिनयासोबतच पूजाच नाव उत्तम डान्सर म्हणून ही घेतलं जात. तिच्या नृत्याचे देखील बरेच चाहते आहे.एका पेक्षा एका या डान्स रिऍलिटी शो मध्ये देखील पूजा स्पर्धक म्हंणून पाहायला मिळाली.अभिनय,नृत्य यांच्या सोबत निवेदनाची धुराही पूजाने पेलली आहे.अशा वेगवेगळ्या माध्यमातून पूजा प्रेक्षकांच्या समोर येत असते. दगडी चाळ, झकास,लपाछपी,सतरंगी रे यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.आणि लवकरच पूजाचा पोस्टर बॉईज २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Pooja Sawant Viral Video)
कलाकार म्हंटल की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हला स्वतःला अपडेट ठेवावं. सततचे शूट्स, मोठ्या मोठ्या शिफ्ट्स, आऊटडोअर शूट यासर्व गोष्टींमध्ये फार थकून जायला होत, काहींकवेळेला कुटुंबापासून लांब राहवं लागत. आणि अशा वेळेला कुटुंबाची जास्त गरज वाटायला लागते. त्यांचं आजूबाजूला असणं किती गरजेचं आहे हे जाणवायला लागत.पूजा तिच्या सोशल मीडियावरून तिच्या कुटुंबाचे बरेच फोटोज शेअर करत असते.तीच तिच्या बहिणीशी विशेष बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळत.
पाहा काय घडलं? (Pooja Sawant Viral Video)
बहिणीचं नातं हे कायमच खास असत. बहिण ही कायमच एक जवळची मैत्रीण असते.पूजा तिची बहिणी रुचिरा हिच्या सोबत फार कनेक्ट आहे.एकमेकींसोबतचे फोटोज व्हिडीओज त्या शेअर करतात. अनेक सेलेब्रेशनना देखील पूजासोबत रुचिरा दिसून येते.असाच सध्या या सावंत बहिणींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतो आहे.परदेशातून परताना ऐअरपोर्ट वरचा पूजा आणि रुचिराचा हा व्हिडिओ आहे.

हे देखील वाचा : अभिनेत्री अदिती द्रविड आणि आजीचा कमाल डान्स होतो आहे व्हायरल
पूजा परदेशातून परतली आहे. रुचिरा पूजाला पिकअप करण्यासाठी ऐअरपोर्टला जाते.आणि बहिणीनीला बघून पूजाला अश्रू अनावर होतात.दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात.पूजाच बहिणीवरच प्रेम तिच्या डोळ्यात दिसून येत आहे.(Pooja Sawant Viral Video)