२०१७ पासून अदितीने तिच्या कामाची सुरुवात केली.नाटकापासून ही सुरुवात झाली,सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने अदिती घराघरात पोहचली.मालिकांसोबतच मोठ्या पडद्यावरही आदितीने पदार्पण केले. सायली संजीव आणि सुव्रत जोशी यांच्या गोष्ट एका पैठीणीची या चित्रपटात देखील अदिती पाहायला मिळाली. (Aditi Dravid Grandmother Video)
अदिती तिच्या सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.वेगवेगळे फोटोशूट, कलाकारांसोबतच बॉण्डिंग यामुळे अदिती बऱ्याचदा चर्चेत असते. तसेच ती तिच्या आजी सोबत वेगळा बॉण्ड शेअर करताना पाहायला मिळते.आजीसोबतचे बरेच फोटोज व्हिडिओज ती तिच्या सोशल मीडियावरून शेअर करते.सध्या या आजी आणि नातीच्या जोडीचा एक व्हिडिओ चांगला चर्चेत आहे.अदितीच्या आजीच्या वय ९० वर्षाच्या आसपास आहे. आणि या वयातही तिच्या आजीची एनर्जी कमाल आहे.
पाहा अदिती आणि आजीचं कमाल बॉण्डिंग (Aditi Dravid Grandmother Video)
ट्रेंडिग गाण्यावरती अदिती आणि आजीने रील बनवली आहे.या रील मध्ये आजीने गॉगल वैगरे घातला आहे.फुगडी,क्युट असा डान्स दोघीनी केला आहे.आणि त्यांचा हा गोडं व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.अनेक कलाकारांनी देखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून त्या दोघींचं कौतुक केलं आहे. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या व्हिडिओला पसंती दर्शवली.(Aditi Dravid Grandmother Video)
हे देखील वाचा : अभिनेत्री अदितीचं स्वप्नांच्या दिशेने पहिलं पाऊल, सुरु केला नवीन बिझनेस वाचा नक्की काय आहे अदितीचा नवीन बिझनेस
अभिनयसोवतच अदिती सध्या तिच्या नव्या बिजनेस मुळे विशेष चर्चेत आली होती.अदिती तिचा नवीन क्लोथिंग ब्रँड सुरु करणार आहे. ड्रेसवाली असं तिच्या ब्रँडच नाव आहे.तिच्या या ब्रॅण्डची अनाऊंसमेंट तिने फार मजेशीर पद्धतीने केली होती, ड्रेसवाली या नावाने तिने कलाकरांना मेसेज केले होते. तेव्हा कोण असणार ड्रेसवाली याची उत्सुकता सर्वानाच होती.