अभिनेत्री पूजा सावंत हिने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. पूजाच्या सुंदर मनमोहक अशा सौंदर्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. सोशल मीडियावरही पूजा बऱ्यापैकी सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच पूजा तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. पूजाने तिचा बॉयफ्रेंड सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली. २८ फेब्रुवारी रोजी पूजा व सिद्धेशचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. पूजा व सिद्धेशच्या बॉलीवूड स्टाईल लग्नाची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. (Pooja sawant weekend post)
पूजा व सिद्धेशच्या लग्नाचे बरेच फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळाले. कुटुंबीय नातेवाईक व सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पूजा तिच्या लग्नानंतर संसारात रमलेली पाहायला मिळाली. चव्हाणांच्या घरी देखील पूजाच जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर पूजा तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला गेली. पूजाचा नवरा हा ऑस्ट्रेलियात राहतो.

पूजाचा नवरा हा मूळचा भारतातला असला तरी तो ऑस्ट्रेलियात कामानिमित्त राहतो. त्यामुळे पूजा आता तिच्या नवऱ्याबरोबर सध्या ऑस्ट्रेलिया येथे गेली असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियातही पूजा बऱ्यापैकी रमलेली पाहायला मिळत आहे. कारण पूजाने तिच्या इंस्टाग्रामवरून ऑस्ट्रेलियाची सफर शेअर केली आहे. पूजाने तिच्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला एन्जॉय करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. परदेशात आता पूजा रमलेली असतानाच ती तिच्या नवऱ्याबरोबर वीकेंडला फिरायला गेली असल्याचा पाहायला समोर आलेल्या फोटोंवरुन पाहायला मिळालं.
यावेळी पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटोज व व्हिडीओज शेअर केले आहेत. “हॅप्पी संडे” असं कॅप्शन देतं अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. आकाश पाळण्यात बसून सुंदर अशा निसर्गरम्य ऑस्ट्रेलियाचा फोटो व व्हिडीओदेखील शेअर केलेला पाहायला मिळत आहे. सध्या पूजा तिच्या नवऱ्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा केला. मराठी संस्कृती जपत पूजाने थेट लग्नानंतर ऑस्ट्रेलियात गुढी उभी केली.