शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या हल्लेखोरांचा चेहरा आला समोर, ‘या’ गॅंगशी आहेत संबंध, नेमका प्रकार काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 15, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
salman khan firing case

सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या हल्लेखोरांचा चेहरा आला समोर, ‘या’ गॅंगशी आहेत संबंध, नेमका प्रकार काय?

रविवारचा दिवस हा मनोरंजनविश्वासाठी धक्कादायक होता. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर आज्ञातांनी गोळीबार केला. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला आणि चार ते पाच वेळा फायरिंग करुन बाइकस्वार पसार झाले. दरम्यान या गोळीबारामध्ये कोणीही जखमी न झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून तपास करण्यास सुरुवात झाली. गोळीबार झाला त्यावेळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले असून महत्त्वाची माहिती हाती आली आहे. (salman khan firing case)

सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यावेळी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले होते. हे फुटेज सर्व पोलिस स्थानकात दिले गेले होते. आता मुंबई पोलिसांची नजर या दोघांवर असून जागोजागी दोघांना शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आणखी वाचा – सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांकडून गोळीबार, मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशय, घराबाहेरील सुरक्षा वाढवली

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींपैकी एका व्यक्तीने लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता तर एकाने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्यातील लाल रंगाचा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीचे नाव विशाल उर्फ कालूचा चेहरा गुरुग्राम येथील स्क्रॅप डीलर सचिनच्या हत्येनंतर फरार आरोपीमध्ये समाविष्ट आहे. तसेच तो गँगस्टर रोहित गोदारासाठी काम करत असल्याचेही समोर आले आहे.

आणखी वाचा – अखेर मानसी नाईकचा मिस्ट्री मॅन समोर, प्रेमाचीही कबुली दिली?, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाला, “माझं प्रेम…”

सलमानच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. या साठी पोलिसांनी १५ टीम बनवल्या असून वेगवेगळ्या पद्धतीने तपास करणार आहे. ‘आजतक’च्या रिपोर्टनुसार, एजंसिला शूटर्सबद्दल महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्यातील एक शूटर हरियाणातील असून दुसरा राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे. तसेच गँगस्टर लॉरेन्स बिश्णोइशीचे गांव राजस्थान येथील कुख्यात गुंड रोहित गोदाराचे नावदेखील समोर आले आहे. राजस्थानमधील गोंगामेडी हत्याकांडातील रोहितच्या विरोधात इंटरपोलने नोटिस जारी केली आहे. मुंबईबरोबरच दिल्ली पोलिसदेखील आता सतर्क झाली आहे. हल्ला करणाऱ्यांचे फोटो सर्व पोलिस स्थानकात देण्यात आले आहेत.

आणखी वाचा – मुंबई इंडियन्ससाठी वानखेडेला पोहोचली देशमुखांची सून, दोन्ही मुलांसह मनसोक्त एन्जॉय करताना दिसली अन्…; फोटो व्हायरल

दोघांच्या विरोधात कलम ३०७ अंतर्गत व आर्म्स कलमाअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आले आहेत. सलमानच्या सिक्युरिटी गार्डच्या दिलेल्या जबानीवरुन  एफआयआर दाखल करण्यात आली. सलमानच्या घरावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी बाइक माऊंट मेरी चर्चच्या इथे सोडून दिली आणि ते तिथून पसार झाले.     

Tags: firinggangstersalman khanshooting
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
paaru serial update

आदित्यने अजयच्या तावडीतून पारूची केली सुटका, सुखरुप घरी आणल्यानंतर अहिल्यादेवी भेटीला, दोघींमध्ये नेमकं काय बोलणं होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.