सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळींच्या घरी ही गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा होताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या गणरायांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. गणरायाचे आगमन करतानाचा कलाकार मंडळींचा उत्साह यावेळी पाहायला मिळतोय. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना एका अभिनेत्रीने गणरायाच्या दर्शनाचे खास फोटो शेअर केले आहेत. ही मराठी अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. पूजा सावंतचे नाव लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये आवर्जून घेतलं जातं. (Pooja Sawant Ganeshotsav)
पूजाने तिच्या घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केला आहे पण हा फोटो खास यासाठी आहे की, पूजा थेट गणरायाचे दर्शन घेण्यासाठी ऑस्ट्रेलियावरुन भारतात परतली आहे. लग्नानंतर पूजा ही तिच्या नवऱ्यासह ऑस्ट्रेलियात राहते. कारण पूजाचा नवरा हा कामामुळे ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. अधून मधून कामानिमित्त ती भारतात येत असते मात्र काही दिवसांपूर्वीच ती ऑस्ट्रेलियाला तिच्या नवऱ्याकडे गेली होती. मात्र आता गणेशोत्सवाचे औचित्य साधत फक्त पूजाच नव्हे तर ती तिच्या नवऱ्यासह भारतात परतली आहे. पूजाच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींनी एकत्र येत गणरायाचे दर्शन घेतलेले पाहायला मिळतेय.
आणखी वाचा – दीपिका पदुकोण मुंबईतील रुग्णालयात दाखल, लवकरच देणार गुडन्यूज
गणपती बाप्पांबरोबरचा फोटो शेअर करत पूजाने याबाबतची माहिती दिली आहे. या फोटो खाली कॅप्शन देत तिने असं म्हटलं आहे की, “गणपती बाप्पांबरोबर आम्हीही आमच्या घरी आलो. गणपती बाप्पा मोरया”, असं म्हणत तिने गणेशाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची दोन्ही कुटुंब एकत्र आलेली दिसत आहेत. या फोटोत पूजाचा पारंपरिक अंदाजही प्रेक्षकांना अधिक भावतोय. पूजा भारतात आल्यानंतर गणेशोत्सवाचा आनंद लुटत खूप खुश दिसत आहे.
आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे विशेष चर्चेत आली. गेल्यावर्षी पूजाने सोशल मीडियावरुन खास फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून आज त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. पूजाचा नवरा सिद्धेश चव्हाण सध्या भारतात राहत नसून ऑस्ट्रेलियातील एका फायनान्स कंपनीत काम करतो. मात्र तो मूळचा मुंबईचा आहे. कामानिमित्त तो काही काळ ऑस्ट्रेलियात राहत आहे. त्यामुळे काम व शूटिंगमधून वेळात वेळ काढत पूजा ऑस्ट्रेलिया भारत असा दौरा करत असते