कलाकार मंडळी म्हटलं की त्यांची सेटवरची ये जा ही आलीच. त्यात या कलाकार मंडळींची मुलंही अधूनमधून सेटवर पालकांसोबत येत असतात. सेटवर आपले आई बाबा कसे काम करतात हे पाहण्यासाठी वा सुट्टीत आईसोबत म्हणून वेळ घालवायला कलाकार मंडळींची मुलं सेटवर येतात. अशातच अभिनेत्री नम्रता ही तिच्या लेकासोबत सेटवर आलेली पाहायला मिळतेय.(Namrata Sambherao New Video)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आजवर प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. या कार्यक्रमातील कलाकार मंडळींमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेरावही तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकत असते. लॉली या भूमिकेसाठी नम्रता चांगलीच चर्चेत असते.
पाहा नम्रता आणि लेकाची धमाल (Namrata Sambherao New Video)
नम्रता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरही तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरून नम्रता तिचा मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रुद्राज आई सोबत दिसतोय. बर तो यावेळी आई सोबत सेटवर आला असून आईचा मेकअप करताना दिसतोय. नम्रताने my little मेकअप मॅन असं म्हणत रुद्राजसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.(Namrata Sambherao New Video)
हे देखील वाचा – गौरीनंतर यशच्या आयुष्यात प्रेमाची नवीन चाहूल ?
कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नम्रताने कलाश्रेत्रात स्वतःचे स्थान स्वतः कमावले आहे. नम्रताने आजवर अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करणं कधीच थांबवलं नाही. सोशल मिडियावरही नम्रताचा वावर सर्वाधिक असेलला पाहायला मिळतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील तिच्या लॉली या पात्राने आजवर प्रेक्षकांना पोटभरून हसवल तर आहेच मात्र कधी कधी तिची साध्या आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते.(Namrata Sambherao New Video)
तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने अनेक नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ही नाटक हाऊसफुलही ठरली आहेत. तर बॉक्स ऑफिसवर धमाका करणाऱ्या ‘वाळवी’ चित्रपटात ही नम्रताने काम केले आहे.
