शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Myra Vaikul On Ganeshotsav

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, "आम्हाला माफ…"

काही कलाकार सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके झाले होते. या यादीत बच्चेकंपनीही होतीच. आता ही बच्चेकंपनी सोशल मीडियानंतर मालिकांच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या बालकलाकारांमध्ये एक नाव नक्कीच आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मायरा वायकुळ. मायरा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घरोघरी पोहोचली. त्यानंतर मायराने मालिकाविश्वातून अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. (Myra Vaikul On Ganeshotsav)

मायराच्या घरी ५ दिवसांकरिता बाप्पाचं आगमन झालं होतं. बाप्पाला निरोप देताना ही बालकलाकार भावुक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवर मायराचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये मायरा तिच्या लाडक्या बाप्पाला गाऱ्हाणं घालताना दिसतेय. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. कोकणात ही गाऱ्हाणं घालण्याची प्रथा अजूनही सुरूच आहे. बाप्पाला निरोप देताना ही गाऱ्हाणं घालण्याची परंपरा मायरानेही फॉलो केली आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बाप्पाला निरोप देताना मायराने गाऱ्हाणं घातल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

आणखी वाचा – मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरिजमध्ये एण्ट्री, अभिनेत्रीच्या हटके लूकने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराने “गणपती बाप्पा मोरया! आमच्याकडून काही चुकलं असेल, तर तू आम्हाला माफ कर. आज तुझ्या जाण्याचा दिवस आहे पण, आम्हाला वाटतं तू नको जाऊस. तू गेल्यावर सगळं घर सुनं सुनं वाटतं. म्हणून तू आमच्याकडे नेहमीच राहा अशी आमची इच्छा असते. तुला निरोप द्यायची वेळ आलीये आता, तू हॅपी हॅपी जा आणि पुढच्या वर्षी आमच्याकडे खूप दिवस राहा.” असे बाप्पाकडे गाऱ्हाणं घातलं आहे. मायराने घातलेलं हे गाऱ्हाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, “साखरपुडा…”

मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी मायराच्या या व्हिडिओला पसंती दर्शवत तिच्या या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी या व्हिडिओवर कमेंट करत मायराचं कौतुक केलं आहे.

Tags: entertainmentmyra vaikulmyra vaikul familymyra vaikul fansmyra vaikul on ganeshotsav
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17

'बिग बॉस १७'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.