गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, “साखरपुडा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 27, 2023 | 11:02 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Gauri Kulkarni Clarification On Engagement

'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीच्या 'त्या' फोटोमागील गुपित अखेर उलगडलं, पोस्ट शेअर करत म्हणाली, "साखरपुडा…"

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे ‘आई कुठे काय करते’. ‘आई कठे काय करते’ मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच या मालिकेतून एक्झिट घेतलेल्या गौरी कुलकर्णी हिची काही दिवसांपूर्वी एक पोस्ट चांगलीच चर्चेत राहिली होती. गौरीने तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी चाहत्यांना खुशखबर दिली. (Gauri Kulkarni Clarification On Engagement)

गौरीने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. गौरी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. गौरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर करत गुडन्यूज दिली होती. यावरून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा रंगली. आता मात्र गौरीने शेअर केलेल्या या फोटोमागील गुपित तिने स्वतःच उलगडलं आहे.

आणखी वाचा – “हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, “माझ्या घरी…”

View this post on Instagram

A post shared by Gauri???? (@gaurikulkarni23)

गौरीने शेअर केलेल्या फोटोमध्ये आपला हात दाखवत पोझ दिली होती. तिच्या हातात असलेली अंगठी पाहून चाहत्यांनी तिचा साखरपुडा झाला असा अंदाज लावला होता. आता मात्र चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना पूर्णविराम देत गौरीने गुपित उलगडलं आहे. गौरीचा साखरपुडा झालेला नसून तो फोटो तिच्या नव्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी होता. गौरीने स्वतःचा नेल आर्टचा ब्रँड सुरू केला आहे. तिच्या या नव्या व्यवसायाच्या ब्रँडच नाव आहे ‘नखरेल नेल्स’. याबाबतची माहिती गौरीने एक व्हिडीओ शेअर करत दिली आहे. याबद्दल सांगताना तिने लिहिलं, “हो मी एन्गेज आहे, एका खास गोष्टीशी. मी माझ्या नव्या ब्रँडशी एन्गेज आहे. ‘नखरेल नेल्स’. गौरी कुलकर्णीचा प्रेस ऑन नेल ब्रँड ‘नखरेल नेल्स’. मी माझ्या या बाळाची खूप दिवसांपासून प्लॅनिंग करत होते आणि आता ते तुमच्यासाठी तुमच्या समोर आहे.”

आणखी वाचा – “कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच…”, सोनाली कुलकर्णीने हास्यविर समीर चौघुलेला भेटवस्तू देत केलं कौतुक, म्हणाली, “ज्या क्षणी…”

View this post on Instagram

A post shared by Gauri???? (@gaurikulkarni23)

पुढे गौरीने लिहिलं, “मी जेव्हा खरंच साखरपुडा करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेन.” गौरीच्या या नव्या निर्णयावर सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनीही तिच्यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी तिला तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: aai kuthe kay karteentertainmentgauri kulkarnimarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्याच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Parineeti mangalsutra design similar with Priyanka’s mangalsutra

परिणीती चोप्राचं मंगळसूत्र तुम्ही पाहिलंत का?, बहिण प्रियांका चोप्राशी काय आहे कनेक्शन?, खास डिझाइनने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.