मृणाल कुलकर्णी यांच्या अभिनयाचे अनेक चाहते दिवाने आहेत. सोनपरी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. विशेषतः त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. अभिनयासोबतच दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. या सोनपरीच्या लव्हस्टोरीबद्दल मात्र फार कमी जणांना ठाऊक असेल. चला तर जाणून घेऊया सोनपरी म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या लवस्टोरीबद्दल आजच्या जपलं ते आपलं या भागात.(Mrinal Kulakarni Lovestory)
मृणाल यांनी कानाला खडा या मुलाखतीदरम्यान त्यांच्या लवस्टोरीचा खुलासा केला होता. त्यांना जेव्हा त्यांची आणि रुचिर यांची जोडी नेमकी कुठे जमली असं विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या, ‘मी आणि रुचिर माझा नवरा आम्ही बालपणापासून एकत्र वाढलो असं म्हटलं तरी चालेल. आमची कुटुंब एकमेकांच्या परिचयाची होती. मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल आणि रुचिर माझ्या समोर आला. कारण तेव्हा तो कलामंडळाचा अध्यक्ष वगैरे होता. एकमेकांची घरची परिस्थिती एकमेकांना माहिती होती. त्याला ती इच्छा होती विचारायची पण हिंमत नव्हती तेवढी होत.
पाहा मृणाल आणि रुचिर यांची अनोखी लव्हस्टोरी (Mrinal Kulakarni Lovestory)
त्याला वाटायचं ही पुण्यातली हुजूर बागेतली शिष्ठ मुलगी ही मला नाही म्हणाली तर मला त्रास होईल. तोपर्यंत संपूर्ण कॉलेज मला वहिनी वहिनी म्हणायला लागलं होतं. ११ वीत होते मी आणि वहिनी वगैरे सुरूच होत. पण मला माहीत होतं की तो ज्या दिवशी मला हो म्हणेल त्यादिवशी मी त्याला हो म्हणणार आहे कारण मलाही तो खूप आवडायचा. त्याची काही विचारायचीच तयारी नाही. एक महिना झाला दोन महिने झाले. मी म्हटलं अरे बाबा हा काही विचारत नाही.'(Mrinal Kulakarni Lovestory)
‘एक दिवस माझ्याच भावनांचा कडेलोट झाला आणि मी त्याला बोलले की तू मला काहीतरी विचारणार आहेस असं आपले मित्र मैत्रिणी सांगतायत. विचार पटकन.पेशाने तो आहे वकील. तेव्हापासूनच त्याच्यात ते वकीलीचे गुण होतेच. शब्दात पकडणं हे त्याच्या हातात आहेच. तेव्हा तो म्हणाला, ‘काय विचारणार आहे?’ मी शेवटी कंटाळून म्हणाले, ‘हे बघ तू जे काही विचारणार आहेस ते विचार किंवा नको विचारू त्याचं उत्तर हो असंच आहे.
हे देखील वाचा – करायचं होत कबड्डीमध्ये करिअर पण अपघाताने झाला सुपरस्टार
त्यामुळे माझा नवरा आज इतक्या वर्षांनीही मला सतत चिडवतो की पहिली गोष्ट मी नाही तुला प्रपोज केलेलं आणि दुसरी गोष्ट अजूनही मी तुला काहीच विचारलेलं नाहीये. तू कशाला हो म्हणालीस ते तुझं तुलाच माहितीये.’ अशी ही प्रपोज न करताच जमलेली प्रेमकहाणी सगळ्यांनाच विशेष भावली होती.