अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हटके अदांजामुळे कायम चर्चेत असते. तिच्या फिटनेसचे, लूक्स मुळे तिचे अनेक चाहते आहेत.तिच्या काम सोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांच्या कायम नजरेत राहते.तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्यामुळे ती नेहमी प्रकाशज्योतात असते. तिच्या आणि अर्जुनच्या वयामध्ये १२ वर्षाचे अंतर आहे असं म्हंटल जात. त्यामुळे त्यांच्या नात्यावर बऱ्याचदा टीका होताना पाहायला मिळतात. परंतु मलायका आणि अर्जुन अशा टीकांकडे फार लक्ष देत नाहीत.(Malaika Arora Real Age)

पंरतु या वेळेस मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे, तिचा एक्स पती अरबाज खान यांच्या घटस्फोट झाल्या नंतर ही ते दोघे चर्चचा भाग ठरतात. मलायकाचा फिटनेस बघता तिच्या वयाचा अंदाजच येत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना तीच वय जाणून घेण्याची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत. सध्या एका जुन्या व्हिडिओ मुळे मलायकाच्या खऱ्या वयाविषयीच्या चर्चाना सोशल मीडियावर चांगलंच उधाण आलं आहे.
जाणून घ्या काय आहे मलायिकाच खरं वय ? (Malaika Arora Real Age)

मलायका आणि अभिनेता अरबाज खान एकत्र असताना त्यांनी साजिद खानच्या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती.तेव्हा साजिदने म्हंटल होत की, अरबाज आणि मलायकाच्या वयात २ वर्षाचं अंतर आहे. साजिदने मलायकाला विचारलं होत की तू अरबाजपेक्षा २ वर्षांनी मोठी आहे तर तुला कस वाटत? आणि ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होते आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, मलायका जर अरबाज पेक्षा २ वर्षांनी मोठी असेल तर तीच वय आता ५७ आहे. कारण, गूगल वरील माहितीनुसार अरबाजच आताच वय ५५ वर्ष आहे. पंरतु गूगल वरील माहिती नुसार मलायकाचं आताच वय ४९ आहे. तर नक्की मलायकच वय ४९ आहे कि ५७ हा संभ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण केला आहे.(Malaika Arora Real Age)
हे देखील वाचा : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यांनी चित्रपट नाकारल्यामुळे आमिर खान झाला सैरभैर – अभिनेत्याने ट्विट करत वेधले लक्ष्य